Ram Satpute on Congress : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. आता सोलापुरातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार राम सातपुतेंनी (Ram Satpute) गंभीर आरोप केला आहे. जिहादींना सोबत घेण्याची कॉंग्रेसची मानसिकता आहे. मोदींना (PM Modi) पाडण्यासाठी मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा सातपुतेंनी केला.
राहुल गांधींची तब्बेत अचानक बिघडली; MP दौरा रद्द, रांचीलाही रॅलीसाठी जाणार नाही
आज राम सातपुतेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, एमआयएमने सोलापुरात एकही उमेदवार उभा केलेला नाही. कारण, काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत मशिदींमधून फतवे निघत आहेत. मात्र, या फतव्याविरोधात येथील समाज एक होऊन नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहील. मोदींना पाडण्यासाठी सोलापूरच्या मशिदींमधून फतवे निघत आहेत, असा गंभीर आरोप सातपुतेंनी केला.
वंचितला धक्का! आंबेडकरांचे आदेश धुडकावत जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीसोबत
मोदींना पाडण्यासाठी फतवे निघत आहेत
ते म्हणाले, सोलापुरातील मशिदींमधून मोदींना पाडण्यासाठी फतवे निघत आहेत. त्याचा मी निषेध करतो. सोलापुरात मोदींना पाडण्यासाठी मौलवी फिरत आहेत. वेगवेगळी पत्रके काढली जात आहेत. उर्दू भाषेतील पत्रिकं घराघरांत जात आहेत. मशिदीतून फतवे काढून संविधानाला खुलं आव्हान देण्याचं काम काँग्रेसचे लोक करत आहेत. पण, संविधान वाचवण्यासाठी मोदींच्या पाठीशी उभे राहावं, असं आवाहन सातपुतेंनी केलं.
काँग्रेसची मानसिकता जिहादींना सोबत घेण्याची
कर्नाटकातील हिंदू मुलीच्या हत्येप्रकरणी विचारले असता सातपुतेंनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हिंदू लिंगायत समाजातील नेहा हिरेमठ या मुलीची फय्याज शेख नावाच्या जिहादी मानसिकतेच्या तरुणाने हत्या केली. फैय्याज शेखने एका हिंदू मुलीची निर्घृण हत्या केली कारण तिने त्याचा प्रस्ताव नाकारला होता. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.
ते म्हणाले, नेहा हिरमेठच्या मारेकऱ्याला सरकारने किंवा प्रशासनाने ठेचून काढले पाहिजे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून ते जिहादींना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. नेहाचा मारेकरी असलेल्या फैय्याज शेखला फासावर लटकण्याची मागणी सातपुतेंनी केली.
मी फेटा बांधणार नाही…
यावेळी बोलतांना सातपुतेंनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, जोपर्यंत मराठा आरक्षणाच प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा बांधणार नाही, असं सातपुते म्हणाले.