Nana Patole News : मीही नाराजच पण हाय कमांडचा आदेश पाळावा लागेल असल्याची खंत काँग्रेसचे नेते (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. अखेर ही नाना पटोले यांनी बोलून दाखवली आहे.
Government Schemes : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना आहे तरी काय?
नाना पटोले म्हणाले, सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई मेरिटच्या आधारे हव्या होत्या. आम्ही शेवटपर्यंत किल्ला लढवला पण हायकमांडच्या आदेशाचं पालन कराव लागतं, ही वेळ एकमेकांविरोधात नाहीतर भाजपसारख्या हुकूशाहीला घालवण्याची वेळ असून आम्ही नेत्यांना समजावून सांगणार असल्याचं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.
भाजपचा आयारामांवर दृढ विश्वास : 400 पैकी 116 उमेदवार इतर पक्षांमधून आलेले, महाराष्ट्रात किती?
सांगलीचं तोंडचा घास गेल्यासारखं झालंय…
सांगलीमध्ये विश्वजित कदम यांनी संघटनेचे काम जोमाने केलेलं आहे. या निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेसला मिळणार असल्याची अपेक्षा होती पण तोंडचा घास गेल्यासारखं झालं, अशी कार्यकर्त्यांची भावना असून आम्ही लोकशाही पद्धतीने आमचे कार्यकर्ते नेते बसून चर्चा करतील, आता हायकमांडच्या आदेशाचं पालन करुन पुढे गेलं पाहिजे, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जुनच्या साडी घातलेल्या लुकचा इतिहास माहीत आहे का? वाचा सविस्तर
महायुतीसारखा तमाशा करायचा नाही…
सध्या भाजपकडे कुठलाही मुद्दा नसल्याने भाजपकडून महाविकास आघाडीत आग लावण्याचं काम सुरु केलं जात आहे. वर्षा गायकवाड मुंबईच्या अध्यक्षा आहेत, आज जे काही वरिष्ठांनी आदेश दिलेत त्याचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. हायकमांडला आम्ही सर्व माहिती दिली. हायकमांडही आमच्या बाजूने होते. पण किती ताणायचं याला मर्यादा असते. महायुतीसारखा आम्हाला तमाशा करायचा नसल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे. सांगलीत ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीच्या जागेसाठी विशाल पाटील इच्छूक होते. त्यासाठी विश्वजित कदम यांनी दिल्लीवारी करीत हायकमांडशीही चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरलीयं. विशाल पाटील आता सांगलीतून अपक्ष मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे.