नांदेडमध्ये अशोक चव्हाण-नाना पटोलेंमध्ये फिक्सिंग, प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप

नांदेडमध्ये अशोक चव्हाण-नाना पटोलेंमध्ये फिक्सिंग, प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप

Prakash Amdekar On Nana Patole : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटपावर एकमत न झाल्यानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकरांनी (Prakash Amdekar) वेगळी वाट धरली. त्यांनी अनेक मतदारसंघात आपले उमेदवारी जाहीर केले. त्यानंतर अकोला मतदारसंघात आंबेडकरांच्या विरोधात कॉंग्रेसने अभय पाटील यांनी उमेदवारी दिली. या सर्व घडामोडीनंतर आता प्रकाश आंबडेकरांननाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली. नांदेडमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात फिक्सिग असल्याचा आरोप आंबेडकरांनी केली.

Akola Loksabha : प्रकाश आंबेडकरांकडे एकही वाहन नाही अन् कर्जही नाही… 

आज पत्रकार परिषदेत बोलतांना प्रकाश आंबेडकरांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी नाना पटोलेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, कॉंग्रेसने नाना पटोलेंना भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघातून लढण्यसा सांगितलं होतं. मात्र, पटोलेंनी लढण्यास नकार दिला. मला लढता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. त्याचं खंर असं की, त्यांना भाजपच्या विरोधात लढायचं नव्हतं. आता नाना पटोले आणि भाजपचं नात चव्हाट्यावर आलं. त्यामुळं ते आता आमच्यावरच टीका करत आहेत. वंचितने नितीन गडकरींना पाठिंबा दिला असून तो फडणवीसांच्या सांगण्यावरून दिल्याचं ते सांगत आहे. मात्र कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी सांगितल्यानुसार आम्ही कॉग्रेसच्या उमदेवाराला पाठिंबा दिला. ही बाब पटोलेंना आवडली नाही. त्यामुळे ते वंचितवर टीका करत आहेत, असं आंबेडकर म्हणाले.

Lok Sabha Election : भुजबळांसाठी हेमंत गोडसेंचा राजकीय बळी महायुतीसाठी आवश्यकच ! 

पुढं बोलतांन ते म्हणाले, वंचित बहूजन आघाडीला महाविकास आघाडीत घेऊ नये, ही पटोलेंची भूमिका होती. कारण, वंचित आम्ही महाविकास आघाडी एकत्र आली असती तर भाजपचे अनेक नेते हारले असते आणि ते नाना पटोलेंना नको होतं. त्यामुळं वंचित बहूजन आघाडीला बाहेर ठेवल्याचा दावा आंबेडकरांनी केला.

नांदडेमध्ये कॉंग्रेसने वसंत चव्हाण यांना उमदेवारी दिली. मात्र, ते डायलेसीसवर आहेत. त्यांना प्रचारासाठी बाहेर पडता येत नाह. अशोक चव्हाणांसोबत पटोलेंची उमेदवार मॅच फिक्सिंग झाली, त्यामुळं त्यांनी आजारी असलेल्या उमदेवाराला नांदेडमधून उमेदवारी दिला, असंही आंबेडकर म्हणाले.

कॉंग्रेसला सात जागांवर सहकार्य करू
वंचित महाविकास आघाडीसोबत का गेली नाही, याविषयी विचारले असता आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीतील पक्षीय कलह संपत नसल्यानं आम्ही त्या खिचडीत जाऊन काय करणार? आम्ही मविआतसोबत जाणार नसलो तरी सात लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला सहकार्य करू शकतो. यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्राद्वारे दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube