Maharashtra Politics : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईत झालेल्या पहिल्याच सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज आव्हाड यांनी बंड केलेल्या आमदारांना भावनिक आवाहन केलं होत. मी पक्षातून बाहेर पडतो. तुम्ही परत या, असं आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या याच आवाहनाल आता अजित पवार गटातील नेते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
परांजपे म्हणाले, आधीच योग्य वागले असते, तर ही वेळच आली नसती. वांद्र्यात झालेल्या सभेत अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्टेजवरून अजित पवार वारंवार शरद पवारांना आशिर्वाद देण्यासाठी विनंती करत होते, असेही परांजपे म्हणाले.
शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही; हे रंग बदलणारे सरडे; भुजबळांच्या टीकेवर आव्हाडांचा घणाघात
काय म्हणाले होते आव्हाड ?
याआधी जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, की जर माझ्यामुळे तुम्ही गेला असाल तर परत या मी राजकारण सोडून देतो. मी दूर कुठे तरी निघून जाईल. मला सत्तेचं राजकारण करायचं नाही, मला पैशाचं राजकारण करायचं नाही, मला बँकेचे राजकारण करायचं नाही. तुम्ही परत या. मी माझ्यासोबत जयंत पाटलांनाही घेऊन जातो. त्यांची जर भावना आहे की आम्ही खराब आहोत तर आम्ही निघून जातो. आम्हाला पद, प्रतिष्ठा मिळाली. महाराष्ट्राच्या इतिहासात आपलं नाव निघत आहे. याव्यतिरिक्त माणसाला आणखी काय हवं असतं. आम्ही निघून जातो, असे आव्हाड म्हणाले. शरद पवारांसाठी आम्ही हा त्याग करायला देखील तयार आहोत, असे आव्हाडांनी म्हटले.