Budget Session : राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस सतत कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे.
या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधिमंडळात केली.
Live Blog | Thackeray Vs Shinde : आपण पुन्हा आयाराम-गयारामच्या युगात.. कोण एकनाथ शिंदे?
विधिमंडळाचे अधिवेशन (Budget Session) सध्या सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारला जाब विचारला आहे. त्यात आता गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याही खात्याचा पंचनामा करण्याचे विरोधी पक्षांनी ठरविल्याचे दिसत आहे. आज अजित पवार यांनी थेट पोलिसांवर वाढलेल्या हल्ल्याच्या घटनांचा मुद्दा उपस्थित करत तसे संकेत दिल्याचे दिसत आहे.
पोलिसांवर हल्ले वाढले म्हणजे ही निश्चित काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. या घटना वाढल्या आहेत. त्यातून राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्नही समोर येत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तसेही विरोधी पक्षाचे नेते सातत्याने फडणवीस यांच्यावर निशाणा साधत असतात.
राज्यपालांनी ठाकरेंना बहुमत चाचणी करायला सांगून शिवसेना फोडली; सरन्यायाधीशांचं मोठं विधान
पवार म्हणाले, की ‘राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. अंगावर थेट वाहन चढवणे, वाहनासोबत फरफटत नेणे, लोकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनांत वाढ झालेली आहे. एकंदरीतच राज्यात पोलिसांवर वेगवेगळया ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना वाढत असून नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटारसायकल इत्यादी गोष्टी देण्याची आवश्यकता आहे.’
.. म्हणून पवारांना आम्ही घाबरतो; गुलाबरावांनी सांगितले भन्नाट कारण, वाचा..
‘पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती वाढू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कारवाई होण्यासाठी आणि पोलीसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि असे हल्ले होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करा’ अशी मागणीही अजित पवार यांनी केली.