त्यांना दोन जागा तरी मिळतात का, तेच बघू; ठाकरे गटातील आमदाराचा शिंदेंना टोला

Ambadas Danve : राज्यात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकांतील जागावाटपाबाबत शिंदे गट आणि भाजपात जशी चर्चा सुरू आहे तशा हालचाली महाविकास आघाडीतही सुरू आहेत. शिंदे गटाने भाजपकडे 22 जागा मागितल्याची चर्चा आहे. यावर काल संजय राऊत यांनी शिंदे गटाला पाच जागा मिळाल्या तरी खूप होईल, असा टोला लगावला […]

Eknath Shinde Ambadas Danve

Eknath Shinde Ambadas Danve

Ambadas Danve : राज्यात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकांतील जागावाटपाबाबत शिंदे गट आणि भाजपात जशी चर्चा सुरू आहे तशा हालचाली महाविकास आघाडीतही सुरू आहेत. शिंदे गटाने भाजपकडे 22 जागा मागितल्याची चर्चा आहे. यावर काल संजय राऊत यांनी शिंदे गटाला पाच जागा मिळाल्या तरी खूप होईल, असा टोला लगावला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही शिंदे गटाला टोला लगावला आहे.

‘फडणवीस चांगला माणूस, मला त्यांची कीव येते’; राऊतांचे फडणवीसांना खोचक टोले

दानवे म्हणाले, आगामी निवडणुकीत शिंदेंना दोन जागा तरी मिळतात का ते बघू असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीतही सारेच काही आलबेल आहे असे नाही. शिवसेना ठाकरे गटाने 23 जागांवर दावा सांगितला आहे. यातील किमान 19 जिंकलेल्या जागांवर ठाकरे गट ठाम असल्याचे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून दिसत आहे.

या वक्तव्यांवर आघाडीतील अन्य पक्षांच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे आघाडीतही जागावाटपावरून संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे.

माधुरी दीक्षितला आडनाव बदलण्याचा सल्ला कोणी दिला का? गौतमीच्या बचावासाठी सुषमा अंधारे सरसावल्या

जुन्या फॉर्म्युलाचा रिमांडर 

दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावर काल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल पुण्यात प्रतिक्रिया दिली होती. केसरकर म्हणाले, जागावाटपाबाबत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे जे आधीचे सूत्र होतं ते कायम राहिल अशी आमची अपेक्षा आहे. या सूत्रानुसार थोड्या जागा आधिकच्या हे भाजप आधीपासूनच घेत आला आहे लोकसभेबाबत. शिवसेना राज्यात जास्त लक्ष केंद्रीत करत आली आहे. आमच्या वाट्याला ज्या जागा येतात त्या जागांसदर्भात तयारी करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे तयारी केली तर त्यात चुकीचं काही नाही.

Exit mobile version