APMC Election Result : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत (APMC Election Result) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या नेतृत्वातील पॅनलने 18 पैकी तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले.
या बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने आमदार संजय सावकारे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी आमनेसामने होते. विशेष म्हणजे, या समितीत चौधरी यांचे वर्चस्व होते. यंदा मात्र सावकारे यांनी त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला.
पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने सर्व जागा जिंकल्या
निवडणुकीत आमदार सावकारे यांच्या गटाचे 15 उमेदवार निवडून आले आहेत. तर चौधरी यांच्या गटाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील पारोळा बाजार समितीत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
पारनेरात लंके-औटीच किंग
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार सुजय विखे गटाला मोठा धक्का बसला होता. तसाच धक्का पारनेर बाजार समिती निवडणुकीत विखे गटाला बसला आहे. या बाजार समितीत विखे गटाला मतदारांना सपशेल नाकारले आहे. आतापर्यंत या ठिकाणी १८ पैकी १५ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे या बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. तीन जागांची मतमोजणी सुरू असून, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
धनंजय मुंडेंनी गुलाल उधळला
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.