Maharashtra Assembly Election BJP fourth Candidate list : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुतीचा अद्याप अनेक जागांचा तिढा सुटलेला नाहीये. दरम्यान आज भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. या यादीत दोन नावांचा समावेश आहे. सुधीर लक्ष्णराव पारवे यांना उमरेड (अजा) आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र लालचंदजी मेहता यांना भाजपने तिकीट दिलंय. त्यामुळे या दोन जागांचा तिढा सुटलेला आहे. भाजपचे शिलेदार रिंगणात उतरलेले आहेत.
अखेर भाजपची चौथी यादी जाहीर; नरेंद्र मेहतांना मीरा-भाईंदरमधून संधी
महायुतीत मीरा-भाईंदरची जागा कोणाच्या वाट्याला जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर सस्पेन्स संपला आहे. भाजपच्या चौथ्या यादीत दोन उमेदवारांना संधी मिळालीय. यात उमरेडमधून सुधीर पारवे अन् मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आलीय. आतापर्यंत भाजपचे एकूण 150 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार गीता जैन आहेत. अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी नंतर शिंदे गटाची साथ दिली होती. मात्र आता ही जागा भाजपला सुटली आहे. गीता जैन आणि नरेंद्र मेहता या दोघांनीही सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मेहता यांच्या पारड्यात तिकीट टाकल्याचं दिसतंय.
दिग्दर्शक महेश टिळेकर यांची वचनपूर्ती! पत्र्याच्या शेडमधून सुनीता पोहचली 1 बीएचकेच्या घरात
विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांच्या यादी जाहीर झालीय. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलत. राजकीय पक्षांच्या बैठका, पत्रकार परिषदा, शक्तिप्रदर्शन सोहळे यांना उधाण आलंय. याचपार्श्वभूमीवर भाजपने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या होत्या. आज चौथी यादी जाहीर केली, ज्यात दोन नावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. परंतु महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती आघाडीला अद्यापही 288 जागांसाठी उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीत काही लहान स्थानिक पक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस याशिवाय अन्य लहान पक्षांचा समावेश आहे.