Download App

मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; 5 उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

NCP Sharad Pawar Announced Fifth List Of Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने आपली उमेदवारांची पाचवी अधिकृत यादी जाहीर केलीय. यामध्ये पाचजणांना संधी देण्यात आलेली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाचवी यादी आज जाहीर झालीय.

पुण्यात भाजपच्या गोटात हालचालींना वेग, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रासने धीरज घाटेंच्या भेटीला, काय चर्चा झाली?

पाचव्या यादीत पाच उमेदवारांचा (NCP) समावेश आहे. मोहोळ मतदारसंघात सिद्धी रमेश कदम यांच्याऐवजी आता राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. माढा मतदारसंघातून अभिजित पाटील, पंढरपूर येथून अनिल सावंत, मोर्शी येथून गिरीश काळे, मुलुंडमधून संगीता वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीत पंढरपूर मतदारसंघ नेमका कोणाला सुटणार, यावर उमेदवारीची गणिते अवलंबून होती. परंतु या जागेवर कॉंग्रेस आणि शरद पवार गट दोन्हींकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालीय. त्यामुळे पंढरपूरवरून महाविकास आघाडीत गोंधळ वाढल्याचं चित्र आहे.

पंढरपूरला भगीरथ भालके यांना काँग्रेसने उमेदवारी दिले. तिथेच पवारांनी देखील उमेदवार दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा असलेला पाहायला मिळतोय. काल कॉंग्रसने जाहीर केलेल्या यादीत भगीरथ भालके यांचं नाव होतं तर आज शरद पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत अनिल सावंत याचं नावं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा नेमका कोणता शिलेदार पंढरपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मैत्रीपूर्ण लढत होणार की महाविकास आघाडीत बिघाडीचा संघर्ष पाहावा लागणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. माघार नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हेदेखील पाहावं लागणार आहे.

मोर्शीमधून देवेंद्र भुयार तर भोरमधून शंकर मांडेकर; अजित पवारांची चौथी यादी जाहीर, मलिकांच काय?

काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 करिता अधिकृत 45 उमेदवारांची पहिली यादी 24 ऑक्टोबर 2024 रोजी 22 उमेदवारांची दुसरी यादी 26 ऑक्टोबर 2024 रोजी, 9 उमेदवारांची तिसरी यादी 27 ऑक्टोबर 2024 रोजी आणि 7 उमेदवारांची चौथी यादी दि. 28 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलीय. तर आज पाचवी यादी जाहीर करण्यात आलीय.

 

follow us