Assembly Election 2024 Result Vote Counting In Ahilyanagar : राज्यात मागील दोन महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी हायव्होल्टेज लढती देखील झाल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये देखील जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या असून निकाल काही तासांवर येवून ठेपला आहे. आता उद्या सकाळी निवडणुकीचा निकाल येण्यास सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात मतमोजणीची (Vote Counting) तयारी पूर्ण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक फेऱ्या कुठे होणार हा प्रश्न देखील सर्वांसमोर आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया (Maharashtra Assembly Election 2024 Result)सुरळितपणे पार पडली. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या केंद्रावर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर 14 टेबल लावण्यात येणार आहे. मतदानाचा पहिला कल उद्या सकाळी नऊ वाजता येणार आहे.
अदाणींवरील आरोपानंतर मोठी सेन्सेक्स-निफ्टीत उलथापालथ; शेअर बाजाराची सध्याची स्थिती काय? घ्या जाणून
अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात मतमोजणीच्या किती फेऱ्या होणार? हा प्रश्न सर्वांसमोर आहे. तर अकोले तालुक्यात 22, संगमनेरमध्ये 21, शिर्डीत 20, कोपरगावमध्ये 20, श्रीरामपूरमध्ये 23, नेवाश्यात 20, शेवगावमध्ये 27, राहुरीत 22, पारनेरमध्ये 27, अहमदनगर शहरात 22, श्रीगोंद्यात 25 तर कर्जत-जामखेडमध्ये 26 अशा फेऱ्या होतील, असा अंदाज वर्तवला जातोय. मतमोजणी अवघ्या काही तासांवर येवून ठेपली आहे. राज्यभरातील प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. एक्झिट पोल देखील वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत.
महायुतीचा प्लॅन बी रेडी! शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, “गरज पडली तर..”
सध्या तर चहाची टपरी, गावाची चावडीवर अनेकांच्या पैजा लागल्या आहेत. कोण निवडून येणार, कोण मुख्यमंत्री होणार याचे आखाडे सध्या बांधले जात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने 21 हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले होते. उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी 900 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर 14 टेबल लावण्यात येणार आहे. सर्वाधिक फेऱ्या शेवगाव आणि पारनेर मतदारसंघात होणार असल्याचं दिसतंय. यानंतर कर्जत-जामखेड २६ आणि श्रीगोंदा मतदारसंघात २५ फेऱ्या होणार आहेत.