What Is Main reason Of Mahavikas Aghadi Defeat : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल आज जाहीर झाले आहेत. तर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झालाय. जनतेने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. मतमोजणीत महायुतीचं पारडं जड आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.
राज्यात पु्न्हा एकदा सत्ता महायुतीच्या हातात जाणार आहे, तर पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर येणार, हे देखील आज स्पष्ट झालंय. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा अटीतटीचा सामना होता. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात एकदम टोकाचं राजकारण झालं, याअगोदर अशी परिस्थिती केव्हा निर्माण झाली नव्हती. सरकार स्थापनेनंतर अडीच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले. अगोदर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने युती सरकार बनवलं होतं. नंतर अजित पवार सहभागी झाल्यानंतर महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं होतं.
विधानसभा निवडणूक भाजपसाठी ठरली गेम चेंजर! प्रमुख ‘पाच’ कारणे समोर…
महाराष्ट्राच्या राजकारणाची मागच्या पाच वर्षांत भेळ झाली होती. त्यामुळे आज मतदार राजाकडून एक स्पष्ट कौल सर्वांना हवा होता. अखेर महाराष्ट्राच्या जनतेने आपला निर्णय दिलाय. त्यांनी महायुती सरकारच्या पारड्यात भरभरून मतदान केलंय. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल इतक्या जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत. याचं प्रमुख कारण काय आहे, ते आपण जाणून घेऊ या.
सर्वसामान्य सायबर कॅफे चालकाने बाळासाहेब थोरातांचं राजकारण संपवलं; कोण आहेत अमोल खताळ?
महाविकास आघाडीच्या पराभवाचं कारण काय?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पराभव होण्यामागे नेमकं प्रमुख कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडतोय. तर नकारात्मक प्रकार हा हे आजच्या पराभवामागे प्रमुख कारण अशू शकते. राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, जेष्ठ नागरिक आणि युवकांसाठी काही विशेष योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांना देखील वीज माफी महायुती सरकारने दिली, याचा मतदारांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीला सत्तेत आल्यानंतर जनतेच्या विकासासाठी नेमकी कोणती रणनिती आहे, हे मतदारांना पटवून देता आलेली नाही, त्यामुळे मतदानावर परिणाम झाल्याचं चित्र आहे.
महायुती का जिंकली?
एकीकडे महाविकास आघाडीने महायुती सरकारवर टीका करण्यात आपली जास्त शक्ती खर्च केली. तर दुसरीकडे महायुतीने हिंदुत्वाच्या मुद्यावर
लक्ष केंद्रित केलंय. ‘बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं’ असे मुद्दे महायुतीने प्रचारात आणले आहेत. त्याचबरोबर केवळ अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकारने नेमका कसा केला? हे देखील प्रचाराच्या वेळी मतदारांना समजावून सांगितलं. महाविकास आघाडीला मात्र, राज्याचा विकास कसा करणार? हे सांगता आलेलं नाही. जागा वाटपावरुन आणि मुख्यमंत्री पदावरुन देखील महाविकास आघाडीत मतभेद दिसून आले. लोकसभेच्या पराभवातून धडा घेत चूका सुधारल्यामुळेच महायुती जिंकली आहे.