Download App

महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढू शकते.

Maharashtra Assembly Elections 2024 : देशात लोकसभा निवडणुका (Loksabha Election)पार पडल्या आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीनते चार महिने उरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा अंतिम टप्प्यापर्यंत चालल्याचा फटका बसल्याचा दिसून आला. हाच संभाव्य धोका टाळण्यासाठी महाविकास आघाडीने(MVA) आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने एक प्राथमिक बैठक देखील पार पडली. त्या बैठकीत विधानसभेसाठी जागावाटपाची प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला देखील समोर आला आहे.

Amitabh Bachchan: चाहत्यांना भेटण्यापूर्वी बिग बीं यांनी शिवलिंगावर केला जलाभिषेक! दाखवली घरातील मंदिराची झलक

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गटाने जागा जिंकल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्ष 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवू शकतो. तर लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर जागा निवडून येणारा पक्ष म्हणजे, शिवसेन ठाकरे गट. ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवू शकतो.

Khatro ke Khiladi मध्ये दुखापत; कृष्णा श्रॉफने तरीही खंबीरपणे केला खास स्टंट

तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला (NCP Sharad Pawar group)8 जागांवर बाजी मारता आली. पवार गटाने फक्त 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्यामुळे त्यांचा स्ट्राईकरेट सर्वाधिक म्हणजे 80 टक्के राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अपेक्षाही उंचावल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गट 80 ते 85 जागा लढवू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आणखी काही बैठका होतील. त्या अनुशंगाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपापल्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी यंत्रणा कामाला लावल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विदर्भातील जागांचा आढावा घेतला आहे. कॉंग्रेसने देखील पक्षांतर्गत सर्व्हे सुरु केला आहे. लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईकरेटनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाची विधानसभेतील जागावाटपाची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. पुढच्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागांवर यश मिळवता आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. यंदा मात्र कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीत कॉंग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला अने बड्या नेत्यांनी राम-राम ठोकला अन् भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यामुळे त्या दोन्ही पक्षांचीही अवस्था तितकी चांगली नव्हती.

दुसरीकडे मात्र भाजपसारखा बलाढ्य पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधात उभा ठाकला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचा या पक्षांसमोर टिकाव लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता, मात्र महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरुन मतदान केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला आहे.

महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षाची ताकद कोणत्या भागात अधिक आहे? त्यावरुन विधानसभेची जागावाटप होणार आहे. सारासार विचार केला तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये ठाकरे गटाला जागा सर्वाधिक मिळू शकतात. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट या भागातील विधानसभा मतदासंघात सर्वाधिक जागांवर दावा करु शकतो.

follow us