Download App

खबरदार..! आम्हाला डिवचले तर.. राहुल गांधींच्या सभेआधीच बावनकुळेंचा इशारा

BJP : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लवकरच विदर्भातील नागपुरात सभा होणार आहे. या सभेआधीच राज्यातील राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या (BJP) नेत्यांनी सभेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांची सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आणि त्यांची खासदारकी गेल्यानंतर ही सभा होत आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. सावरकरांवरही राहुल यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे ते या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना दुसरीकडे भाजप नेत्यांनी मात्र टीका करण्यास सुरुवात केली आहे.

तुझेही रोशनी शिंदे सारखे हाल करू…ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला धमकी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तर थेट धमकीवजा इशाराच दिला आहे. बावनकुळे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, की ‘त्यांच्या पक्षाचे काम करण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि राहिला प्रश्न राहुल गांधींच्या सभेचा तर त्यांनी सभा जरूर घ्यावी. सभेने काय होईल हे आधीही देशाने पाहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना राज्यातील जनता माफ करणार नाही. सावरकरांचा त्यांनी वारंवार अपमान केला. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात कितीही सभा घेतल्या तरी काहीच फरक पडणार नाही.’

‘त्यांनी सभा घ्यावी, मोठ्या सभा घ्याव्यात त्यांना अधिकार आहे. पण सभेत नियमाच्या विरोधात काही झाले तर पोलीस बघतील. आम्ही कोणत्याही परिस्थितीत सभेला विरोध करणार नाही. त्यांना सभा घेऊ द्या. पण जर उलटसुलट चर्चा केल्या. डिवचण्याचा प्रयत्न केला. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मग सरकार बघून घेईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

Ameesha Patel अडकली मोठ्या वादात; न्यायालयाकडून वॉरंट जारी… काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, बावनकुळे यांनी दिलेल्या या इशाऱ्यावर अद्याप काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. या मुद्द्यावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us