अनिल परबांचा पाय आणखी खोलात! ‘त्या’ प्रकरणात चार्जशीट दाखल; सोमय्यांचा धक्कादायक खुलासा

Kirit Somaiya vs Anil Parab : दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) आणि तिथल्या सरपंचाविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे माझा आणि रिसॉर्टचा काही संबंध नाही, असे बोलण्याची संधी अनिल परब यांना मिळणार नाही. अनिल परब सध्या जामिनावर आहेत आणि मला विश्वास आहे, की ज्यावेळी हा खटला […]

Untitled Design (39)

Kirit Somayya

Kirit Somaiya vs Anil Parab : दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) आणि तिथल्या सरपंचाविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे माझा आणि रिसॉर्टचा काही संबंध नाही, असे बोलण्याची संधी अनिल परब यांना मिळणार नाही. अनिल परब सध्या जामिनावर आहेत आणि मला विश्वास आहे, की ज्यावेळी हा खटला सुरू होईल. अनिल परब यांच्यावर जे चार्जेस आहेत ते पाहता त्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे मत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्यक्त केले.

BJP: देवेंद्र फडणवीसांच्या ‘मिशन 45’ वर अमित शाहांचा शिक्कामोर्तब, शिंदे गटाचे काय ?

मोदी अॅट 9 या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संमेलनानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अनिल परब यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी सोमय्या म्हणाले, त्यांच्याविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केले आहे. सध्या ते जामिनावर आहेत. ज्यावेळी हा खटला सुरू होईल तेव्हा त्यांच्यावरील आरोप पाहता त्यांना किमान तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते असे सोमय्या म्हणाले.

ते म्हणाले, गेल्या 9 वर्षात भारताने मोठी प्रगती केली. आज भारत जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. सगळ्यांना अभिमान आहे की एका बाजूला भारत आर्थिक महासत्ता होतोय तर दुसऱ्या बाजूला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातही प्रगती करत आहे. आज शेतकरी असो, शेतमजूर असो, बुद्धीजिवी असो, प्रोफेशनल असो या सर्वांना नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. विरोधक म्हणत होते की काश्मिरातून 370 कलम हटवल्यास हिंसा भडकेल परंतु तसे काहीच झाले नाही. हे सरकारचे मोठे यश असल्याचे सोमय्या म्हणाले.

कर्जत बाजार समितीच्या सभापतीची आज निवड, रोहित पवारांकडे की राम शिंदेंकडे जाणार सत्ता?

Exit mobile version