Download App

भूषण देसाई यांना शिवसेनेत घेताच भाजपचा एकनाथ शिंदेंना इशारा..

BJP: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंना जोरदार झटका दिला. मात्र, त्यांचा हा पक्षप्रवेश शिंदे गटाचा सहकारी असलेल्या भाजपमधील (BJP) अनेकांना रुचलेला नाही. या घडामोडींवर सत्ताधारी गटातील मंत्री वा अन्य कुणी फारसे भाष्य केले नसले तरी भाजपमधील स्थानिक पातळीवरील नेत्यांना मात्र आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. भाजपाचे गोरेगाव तालुका उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवत इशाराच दिला आहे.

भ्रष्ट व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षात प्रवेश देऊ नये. आज आपण युतीमध्ये आहोत मात्र मित्रपक्षाची एक चूक सुद्धा दोन्ही पक्षांना महागात पडू शकते, असा इशारा जाधव यांनी या पत्रात दिला आहे.

 

 

या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की मी आत्ताच भूषण देसाई यांच्या प्रवेशाची बातमी टीव्ही चॅनेल्सवर पाहिली. आम्ही गोरेगावकर या भ्रष्ट व्यक्तिमत्वाला चांगलेच ओळखून आहोत. तसेच आम्ही शिवसेनेत होतो, गेले चार वर्षे भाजपात आहोत. भूषण देसाई हा फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आलेले आहेत.

Bharat Gogavale : ..तर सुभाष देसाई हे देखील शिवसेनेत येतील

आपल्या पक्षाचे तसेच आपली प्रतिमा ही खूप चांगली आहे. पण अशा भ्रष्ट आणि मलीन चारित्र्याच्या व्यक्तिमत्वाला आपण राजकीय आश्रय दिल्याने गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना जागल्या आहेत. आज आपण युतीमध्ये आहोत मित्र पक्षाची एक चूक सुद्धा दोन्ही पक्षास महाग पडू शकते. मी एक छोटा कार्यकर्ता आहे पण आपण या सूचनेचा नक्कीच विचार कराल, असे जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.

Tags

follow us