Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे.
500 कोटींचा घोटाळा दडपण्याचा शिंदे-फडणवीसांचा डाव; अजितदादांचा गंभीर आरोप
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी. भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक- 50 कोटी रुपये. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक- 25 कोटी रुपये. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक- 351 कोटी रुपये. स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती- 25 कोटी रुपये. विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी, तर स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली)- 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
तसेच श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास- 500 कोटी रुपये आणि भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी- 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण- 50 कोटी रुपये आणि श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ तरतूद करण्यात आली.
https://www.youtube.com/watch?v=N_-NCOncia8
ऋणमोचन विकासासाठी- 25 कोटी रुपये व श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी देण्यात येणार आहे. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी, तर गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी 25 कोटी रुपये तरतूद करण्यात आली. श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर- 6 कोटी रुपये आणि श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) 25 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.