Download App

सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली…; अर्थसंकल्पावरून पटोलेंची सरकारवर टीका

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) अर्थसंकल्पावरून सरकारला धारेवर धरलं. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसली, अशी टीका पटोलेंनी केली.

  • Written By: Last Updated:

Nana Patole: अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. मात्र विरोधकांनी या अर्थसंकल्पावरून (Maharashtra Budget 2024) सरकारवर सडकून टीका केली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) अर्थसंकल्पावरून सरकारला धारेवर धरलं. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसली, अशी टीका पटोलेंनी केली.

Quotation Gang चा ट्रेलर आऊट; सनी म्हणाली, या चित्रपटाने मला पूर्ण…

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधल. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ घोषणांचा पाऊस आहे. राज्यात अजून 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नाही, त्यामुळे दुबारपेरणी करावी लागत आहे. सरकारने वीजबील माफ करण्याची घोषणा केली. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केलं होतं. पण, या सरकारने वीजबील माफ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहेत, अशी टीका पटोलेंनी केली.

अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचं आवतन, नुसती आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर; ठाकरेंचे टीकास्त्र 

पटोले म्हणाले, नोकरी भरतीचा उल्लेख कुठंही केलला नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असताना आणि पोलीस भरतीत गैरव्यवहार झालेला असताना नोकर भरतीबद्दल न बोलणं चुकीच आहे. महिलांना दरमहा साडेआठ हजार रुपये देण्याची गॅंरटी काँग्रेसने दिली होती. पण या सरकारने दीड हजार रुपये देऊन साठ टक्के कमिशन खाल्लं आहे. महागाईच्या काळात दीड हजार रुपये म्हणजे, फसवण्याचं काम सरकार आहेत, अशी टीका पटोलेंनी केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
हा अर्थसंकल्प म्हणजे, लबाडा घरचं आवतन आहे. यात फक्त आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर आहे, अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला. आजपर्यंत महायुती सरकारने ज्या घोषणा केल्या, त्यातील किती घोषणांची अंमलबजवाणी झाली याची श्वेतपत्रिका काढा, असंही ठाकरे म्हणाले.

 

follow us

वेब स्टोरीज