अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचं आवतन, नुसती आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर; ठाकरेंचे टीकास्त्र

अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचं आवतन, नुसती आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर; ठाकरेंचे टीकास्त्र

Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांन (Ajit Pawar) आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक योजनांच्या घोषणा केली. दरम्यान, विरोधकांनी या अर्थसंकल्पावरून (Maharashtra Budget 2024) सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray) हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचं आवतन आहे, अशी टीका केली.

Drama Junior च्या सेटवर अमृता आणि संकर्षणची जमली मैफिल! 

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलतांना ते म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आश्वासने आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही दणका त्यांना दिला, त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेस किलकिले झालेले दिसत आहे. तही देखील जनता त्यांच्या थांपावर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही, महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. त्यांनी कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र ओरबडून गुजरातला नेण्याचं षडयंज्ञ उघड झालंय, महाराष्ट्र गुजरातच्या पाठी गेला आहे, असं ठाकरे म्हणाले.

शेतकरी, महिलांसाठी अजित पवारांकडून मोठ्या घोषणा, एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण अर्थसंकल्प 

 

पुढं बोलताना ठाकरे म्हणाले, हा अर्थसंकल्प म्हणजे, लबाडा घरचं आवतन आहे. यात फक्त आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर आहे, अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला. आजपर्यंत महायुती सरकारने ज्या घोषणा केल्या, त्यातील किती घोषणांची अंमलबजवाणी झाली याची श्वेतपत्रिका काढा, असंही ठाकरे म्हणाले.

सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका… माता बहीणींसाठी जरूर योजना आणा. पण, बेकार असलेल्या तरुण भावांसाठीही लाडका भाऊ, लाडका पुत्र अशी काहीतरी योजना आणा, असं ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांचं वीजबील माफ केलं. पण, इतर प्रश्नांचं काय? शेतकऱ्यंची कर्जमाफी झाली नाही. निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेला हा अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे गाजर दाखवण्याचा प्रयत्न आहे. याच्या तरतूदी कशा होणारहा खरा प्रश्न असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज