Download App

अर्थसंकल्प नव्हे तर फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला. - वडेट्टीवार

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : अर्थमंत्री अजित पवा (Ajit Pawar) यांनी आज विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. मात्र विरोधकांनी या अर्थसंकल्पावरून (Maharashtra Budget 2024) सरकारवर सडकून टीका केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवा (Vijay Wadettiwar) यांनी हा तर फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प असल्याची टीका केली.

Jayant Patil : ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’, जयंत पाटलांचा महायुतीला टोला 

वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, अर्थमंत्र्यांनी आज विधानसभेत फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प सादर केला. अडीच वर्षे केवळ घोटाळे, टेंडर, कमिशन आणि टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला, अशी टीका त्यांनी केली.

अर्थसंकल्पाच्याआडून महायुतीच्या आमदारांना खूश करण्यासाठी केलेल्या शेवटचा प्रयत्न म्हणजे अतिरिक्त संकल्प आहे, असंही ते म्हणाले.

सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली…; अर्थसंकल्पावरून पटोलेंची सरकारवर टीका 

महायुती सरकारने महिलांसाठी योजना जाहीर करून प्रायश्चित घेतले आहे. महायुतीच्या एका नेत्याने बहिण-भावाच्या नात्यावर केलेले घाणेरडे वक्तव्य महायुतीला चांगलेच महागात पडले. राज्यात महिलांवर अन्याच, अत्याचार वाढले आहेत. या सरकारने गरीब महिलांना फाटक्या साड्यांचे वाटप केले, याचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहिण योजना आणली आहे. गरीब माता-भगिनींना फाडक्या साड्या वाटून पुन्हा त्यावर योजनांची ठिगळं लावून काही उपयोग होणार नाही. राज्यातील महिला या सरकारला चांगलाच धडा शिकवणार आहेत, असा हल्ला वडेट्टीवार यांनी केला.

लबाडा घरचं आवतन…
राज्यातील शेतकरी, महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योती यांसारख्या संस्थांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या. पण हे लबाडाचं आमंत्रण आहे. ते जेवल्यानंतरच खरं मानावं लागेल. त्यामुळे या फसव्या तरतुदींना भूलून जाऊ नये. कारण अर्थसंकल्प सादर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करताना जुमलेबाजी करायची हा या सरकारचा शिरस्ता आहे, असा खोचक टोला वडेट्टीवारांना लगावला.

follow us

वेब स्टोरीज