Maharashtra Cabinet 2024 : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, दत्तामामा भरणे, बाबासाहेब पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या पराभव केला होता. तर नरहरी झिरवाळ (Narhari Jirwal) यांनी पुन्हा एकदा दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे. मागच्या सरकारमध्ये महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी देखील पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अनिल नवगणे यांचा पराभव केला होता. तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
नवा फॉर्मुला, मंत्रिपदाची संधी फक्त अडीच वर्षांसाठी, अजितदादा नेमकं काय म्हणाले ?
तर दत्तामामा भरणे (Dattamama Bharane) यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. तर अहमदपूर विधानसभा मतदारसांघातून बाजी मारणारे बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून आज शपथ घेतली आहे. याच बरोबर वाई मतदारसंघातून विजय झालेले मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस गटातून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजयी उमेदवार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना देखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. तर पुसद विधानसभा मतदारसंघातून बाजी मारणारे इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे
तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेला नाही. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज झाल्याच्या बातम्या देखील समोर येत आहे.
अनुष्का शेट्टीचा ‘घाटी’ 18 एप्रिलला मोठ्या पडद्यावर, पाच भाषांमध्ये होणार रिलीज