कराडमध्ये पवारांचे स्वागत करणारे मकरंद पाटील अजितदादांच्या गटात

  • Written By: Published:
कराडमध्ये पवारांचे स्वागत करणारे मकरंद पाटील अजितदादांच्या गटात

MAL Makarand Patil With Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. पक्ष व चिन्ह मिळविण्यासाठी, अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांना 37 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यासाठी अजित पवार हे आपल्याकडे आमदार खेचत आहेत. अशातच त्यांनी कराडमध्ये पवारांचे स्वागत करणारे आमदार मकरंद पाटील ( Makarand Patil ) यांना आपल्या गटात सामील करून घेतले आहे.  (MAL Makarand Patil With Ajit Pawar Group)

वाई – खंडाळा – महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सोबत जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे उपस्थित होते.

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांच्या गाडीतून प्रवास करत पवारांचे कराडमध्ये स्वागत करणारे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी वाई – खंडाळा – महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा; कोल्हेंचा हल्लाबोल

आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांनी आज देवगिरी बंगल्यावर जाऊन निर्णय जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीत आता तीन आमदारांचा समावेश झाला असून वाई मतदारसंघातील सर्व कार्यकर्तेही त्यांच्यासोबत राहणार आहेत.

अजित पवारांच्या बंडानंतर आमदार मकरंद पाटील हे अजित पवार यांच्यासोबत होते. परंतु त्याच्या घरांचे शरद पवार यांच्याशी असलेले संबंधामुळे ते पुन्हा पवारांकडे फिरले होते. नंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत गेल्यामुळे त्यांच्याकडील आमदारांची संख्या 34 झाली आहे. तर आता शरद पवारांकडे 16 आमदार आहेत. नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, नाशिकमधील आमदार सरोज अहिरे व मुंबईतील नवाल मलिक अशा 3 जणांनी यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube