शिंदेंची मोठी खेळी! तीन दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट; सहा नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

मंत्रिमंडळात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Abdul Sattar Deepak Kesarkar And Tanaji Sawant

Abdul Sattar Deepak Kesarkar And Tanaji Sawant

Eknath Shinde Shivsena : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. या मंत्रिमंडळात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मागील सरकारच्या काळात मंत्रि‍पदे भूषवलेल्या अनेक नेत्यांना यंदा डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट केला आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेला 12 मंत्रि‍पदे मिळणार आहेत. अजित पवार गटाला 10 मंत्रि‍पदे मिळणार आहेत.

मुंडे-बहीण भावाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ! धनंजय मुंडेही घेणार शपथ, शेवटच्या क्षणी सस्पेन्स संपला..

मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याचा निर्णय अंतिम झाल्यानंतर भावी मंत्र्‍यांना आज सकाळपासूनच फोन सुरू झाले होते. भाजपकडून कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार याची यादी समोर आली होती. भाजपने यंदा माजी मंत्र्‍यांना संधी नाकारली. त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. याच पद्धतीने शिंदे गटानेही धक्कातंत्राचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

शिंदे गटाने यंदा माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना संधी मिळणार नसल्याचे नक्की केले आहे. मंत्र्यांच्या यादीत या तिघांची नावं नाहीत. तसेच शिंदे गटाने यंदा सहा नव्या चेहऱ्यांना मंत्रि‍पदाची संधी दिली आहे. त्यामुळे यंदा शिंदेंच्या शिवसेनेत नवीन मंत्री दिसणार आहेत. या मंत्रिमंडळात नवीन चेहरे दिसणार असले तरी ज्यांना मंत्रिपदं नाकारली आहेत त्यांनी आतापासूनच नाराजीचा सूर लावला आहे.

शिवसेनेतून कुणाला संधी

उदय सामंत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगेश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट

पाच जुन्या मंत्र्यांना संधी

उदय सामंत कोकण
शंभूराज देसाई पश्चिम महाराष्ट्र
गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
संजय राठोड, विदर्भ

या नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

प्रताप सरनाईक
भरत गोगावले
योगेश कदम
प्रकाश आबिटकर
संजय शिरसाट
आशिष जैस्वाल

 

Exit mobile version