मुंडे-बहीण भावाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ! धनंजय मुंडेही घेणार शपथ, शेवटच्या क्षणी सस्पेन्स संपला…
Maharashtra Cabinet expansion : महायुती सरकारमधील (Mahayuti) नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज (15 डिसेंबर) होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet expansion) अवघे काही तासांवर आला. मात्र, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आला नव्हता. अखेर आता आता धनंजय मुंडेंना (Dhananjay Mude) मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे. त्यामुळं एकाच घरात दोन मंत्रिपदे मिळणार आहेत.
सोलापूरवर वरिष्ठांची मर्जी खप्पा! एकाही आमदाराचा फोन वाजला नाही; मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी
महायुती सरकाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज नागपूरला होतोय. शनिवारी उशिरापर्यंत मंत्रीपदांवर शिक्कामोर्तब झाले नव्हते. त्यामुळे मंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले अनेक आमदार पक्षश्रेष्ठींच्या निरोपाची उशिरापर्यंत वाट पाहत होते. दरम्यान, राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपद निश्चित झालीत.
सोलापूरवर वरिष्ठांची मर्जी खप्पा! एकाही आमदाराचा फोन वाजला नाही; मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी
यापूर्वी कॅबिनेट मंत्रिपद आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविलेल्या धनंजय मुंडे यांच्यासह प्रकाश सोळंके यांनीही मंत्रिपदासाठी जोर लावला होता. मात्र, मुंडे यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन आला नव्हता. त्यामुळं विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आता राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडेच्या नावाचा समावेश करण्यात आला. थोडक्यात काय तर आता दोन्ही बहीण भावाला मंत्रिपदे मिळणार आहे. कारण, भाजपच्या संभाव्य मंत्रिपदांच्या यादीत पंकजा मुंडे यांचेही नाव आहे.
परळीत उत्साहाचे वातावरण…
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले होते. त्यामुळं मुंडेंचा पत्ता कट होणार अशी चर्चा होती. आता संभाव्य मंत्रिमंडळ यादीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश झाल्याने परळीत उत्साहाचे वातावरण आहे.
धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे फायरब्रॅन्ड नेते
धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फायर ब्रँड आणि प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. परळी विधानसभा मतदारसंघातून ते राज्यातून सर्वाधिक दुसऱ्या नंबरच्या म्हणजे एक लाख 40 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. परळी मधील त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. राज्यात सर्वाधिक मतदान घेण्यात त्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.
पक्षासाठी व महायुतीच्या उमेदवारांसाठी विधानसभेत त्यांनी 24 पेक्षा जास्त मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या.
याआधी त्यांनी शिंदे मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून तर ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. 2014 ते 19 या काळात विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची अतिशय चमकदार कामगिरी राहिली होती. पक्षातील तरुण, आक्रमक, अभ्यासू, ओबीसी आणि मराठवाड्यातील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार विजय झाले असून त्यात धनंजय मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अतिशय निकटवर्तिय म्हणून ओळखले जातात.
ठाकरे पित्रा-पुत्र राहिलेले होते एकाच मंत्रिमंडळात मंत्री…
दरम्यान, ठाकरे सरकारमध्ये पिता पुत्रांनी मंत्रिपदे भुषवली होती. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं होतं. तर त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे मुख्यंत्री होते. वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री असे उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच पाहायला मिळाले होते.