सोलापूरवर वरिष्ठांची मर्जी खप्पा! एकाही आमदाराचा फोन वाजला नाही; मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी

सोलापूरवर वरिष्ठांची मर्जी खप्पा! एकाही आमदाराचा फोन वाजला नाही; मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी

Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय होऊन संभाव्य मंत्र्यांचे फोन खणखणू लागले आहेत. मंत्रि‍पदासाठी नावे निश्चित करताना काही माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील आमदार फोनची वाट पाहत आहेत मात्र एकाही आमदाराला फोन आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे. महायुती सरकारच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराचं नाव नाही.

कही खुशी कही गम! भाजपाच्या ‘या’ दोन दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट? पडद्यामागं काय ठरलं..  

आजमितीस सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आहेत. परंतु, या पाचपैकी एकाही आमदाराला मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही. मागील पाच वर्षांचा विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नव्हतं. आता हीच पुनरावृत्ती नव्या सरकारमध्येही होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हाभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सन 2014 मध्ये महायुती सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याला सुभाष देशमुख यांच्या रुपाने एक कॅबिनेट मंत्रिपद तर विजयकुमार देशमुख यांच्या रुपाने एक राज्यमंत्रिपद मिळाले होते. विजयकुमार देशमुख सलग पाचवेळा आणि सुभाष देशमुख सलग तीनवेळा आमदार आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचंही वजन आहे. त्यांची प्रशासनावर घट्ट पकड आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात.

त्यामुळे या तीन आमदारांची नावं मंत्रि‍पदासाठी चर्चेत होती. परंतु, या तिघांपैकी एकालाही मंत्रिपद मिळणार नाही हे आता निश्चित झालं आहे. सुभाष देशमुख आणि विजय देशमुख मंत्रि‍पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात सुभाष देशमुख मंत्री होती. सहकार खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळे आता यंदा त्यांना लाल दिवा मिळेल अशी शक्यता जिल्ह्याच्या राजकारणात व्यक्त केली जात होती. मात्र शपथविधीसाठी काही तासच शिल्लक राहिलेले असतानाही अजून सुभाष देशमुख यांना फोन आलेला नाही.

बावनकुळे घेणार मंत्रिपदाची शपथ, प्रदेशाध्यक्षपदी फडणवीसांच्या ‘या’ विश्वासू नेत्याचे नाव आघाडीवर..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube