भुजबळांचा RSS ला मोलाचा सल्ला; म्हणाले, ‘अशा’ लोकांवर आरएसएसने..

Chagan Bhujbal on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कुणीही देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. तसा आरोप कुणीही करू नये. मात्र, संघात आहे असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर आरएसएसने नजर ठेवली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. पुण्यातील डीआरडीओचे संचालक व तत्कालीन रिसर्च […]

Chagan Bhujbal

Chagan Bhujbal

Chagan Bhujbal on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कुणीही देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. तसा आरोप कुणीही करू नये. मात्र, संघात आहे असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर आरएसएसने नजर ठेवली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. पुण्यातील डीआरडीओचे संचालक व तत्कालीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॉब्लिस्ट प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी भुजबळ यांनी रोखठोक मत व्यक्त केले.

मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावर आज भुजबळ यांनी भाष्य केले. संघात आहे असे सांगून असे धंदे करणाऱ्या लोकांवर संघाने लक्ष ठेवले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशद्रोहाचा आरोप कुणीही करू शकत नाही. तसा आरोप करता कामा नये. मात्र संघटनेत आहे असे सांगून जे काही चांगले वाईट धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर संघाने नजर ठेवली पाहिजे.

पोलीस आणि इंटेलिजन्स यंत्रणांनी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. कोणीही असे हनी ट्रॅपमध्ये अडकणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. राष्ट्राला धोका देणारे कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.

.. तर मग सर्वांवरच कारवाई करणार का ? काँग्रेस-भाजप युतीवर वडेट्टीवारांचा सवाल

केरला स्टोरी चित्रपटाच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मी केरला स्टोरी चित्रपट अजून पाहिलेला नाही. धर्माधर्मात भांडणे लागतील आणि त्याचा फायदा निवडणुकीत होईल अशा ज्या कलाकृती आहेत त्या दाखवता कामा नयेत. दाखवल्या तरी लोकांनी मनावर घेता कामा नयेत, असे भुजबळ म्हणाले.

मिठाचे खडे टाकू नका 

काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी भाजपाचा प्लॅन बी सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यावर भुजबळ म्हणाले, तीन पक्ष वेगळ्या विचारधारेचे आल्यावर थोडे घर्षण होणार, नेत्यांनी काही बोलले तर विस्कळीतपणा येणार मात्र ते होता कामा नये.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळात सरकार गेलं. मला वाटतं की चव्हणांनी अंतर्मनात शोध घ्यावा असं कसं झालं. आपणच मुख्यमंत्री असताना हे कसं झालं. याचा विचार करावा. अशी वक्तव्ये पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जोपर्यंत सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्रित आहेत तोपर्यंत कोण काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इतर नेत्यांनीही काही वक्तव्ये करून मिठाचे खडे टाकू नयेत.

Exit mobile version