Download App

मोदी है तो मुमकीन है! 1992 साली लाँच झालेला फाँट 1983 साली कसा? काँग्रेसचा मोदींना सवाल

Maharashtra Congress On PM Narendra Modi Degree :  गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांची डिग्री हा चर्चेचा विषय होतो आहे. यावरुन मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य पहायला मिळत आहे. त्यामध्ये आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ऊडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवर प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियार एक डिग्री व्हायरल होते आहे. त्यावरुन काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

जो फॉंट १९९२ साली डेव्हलप केला गेला, तो मोदींच्या १९८३ सालच्या सर्टिफिकेट वर कसा? डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे! असे म्हणत मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. हा गुजरात विद्यापीठाच्या डिग्रीचा हा फोटो असून 13 मार्च 1983 अशी त्यावर तारीख आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मोदींच्या डिग्रीचा विषय चर्चेचा ठरला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री बोगस असून त्यांनी ती सार्वजनिक करावी, अशी मागणी केली होती. यावरुन गुजरात न्यायालयाने त्यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

केजरीवाल यांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने गुजरात विद्यापीठाला मोदींची डिग्री सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. यावरुन गुजरात न्यायालयाने या निर्णयाला रद्द ठरवले आहे व केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

“आओ चोरों बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा” संभाजीनगरच्या सभेवर रावसाहेब दानवेंनी टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील मोदींच्या डिग्रीवरुन त्यांना टोला लगावला आहे. लोक म्हणतात ही बोगस आहे. एन्टायर पोलिटिकल सायन्स विषयातली ही ऐतिहासिक, क्रांतिकारी पदवी. नव्या संसद भवनाच्या दारावर ही फ्रेम करुन लटकवा, म्हणजे लोक मोदींच्या पदवीवरुन संशय घेणार नाहीत. अशा शब्दामध्ये राऊतांनी मोदींना टोला लगावला आहे.

Tags

follow us