Nana patole : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आ. बाळासाहेब थोरात यांच्यात नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता काँग्रेस पक्षात थेट दिल्लीतून फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याचीही चर्चा होत आहे.
वाचा : Nana Patole कार्यक्रमाला आले नाही म्हणून आयोजकाचा घरी जाऊन संताप, व्हिडिओ व्हायरल
या मुद्द्यावर आता पटोले यांनी थेट उत्तर दिले आहे. त्यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यानंतर पटोले म्हणाले, की काँग्रेसमध्ये कोणताही गोंधळ झालेला नव्हता उलट गोंधळ निर्माण करण्याचे काम केले गेले होते. काँग्रेस पक्षात काही बदल होतीलच आणि हे फेरबदल सर्वांना मान्य करावे लागतील. काँग्रेस पक्षात पटोले यांच्याविषयी नाराजी असल्याच्या मुद्दयावर पटोले म्हणाले, की काँग्रेसमध्ये माझ्याबाबत कोणतीही नाराजी नाही.
Nana Patole : भाजप हा फक्त काही उद्योगपतींचा पक्ष पटोलेंचा भाजपवर निशाणा
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाले. मात्र या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याआधीपासून सुरू असलेला वाद समोर आला होता. नाना पटोले आणि माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यातही पटत नसल्याची चर्चा सुरू होती. तांबे कुटुंबियांनी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केल्याचे तर पटोले यांनी जाहीरपणे सांगितले होते. यानंतर सत्यजित तांबे यांनीही पत्रकार परिषद घेऊन पटोले यांच्यावर टीका केली होती. या सगळ्या घडामोडीत काँग्रेस पक्षात सुरू असलेला बेबनाव समोर आला होता.