Download App

अजितदादा अन् शिंदे सत्तेत का गेले? चव्हाणांनी सांगितलं आतलं राजकारण

Maharashtra Politics : राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जवळ (Maharashtra Politics) येत आहेत तसे सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आताही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिंदे गट हा चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत गेला आहे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. शिंदे गटाचे अस्तित्व फक्त ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. त्यांनी गद्दारी, फितुरी करून सत्ता हस्तगत केली. पाठीत खंजीर खुपसून दोन गट सत्तेत सहभागी झाले, अशी जळजळीत टीका चव्हाण यांनी केली.

कांदा खरेदी करण्याचा निर्णय कसा झाला? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं…

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटावर जोरदार प्रहार केले. तसेच निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक उशीरा आहे. ऑक्टोबरमध्ये होतील अशी शक्यता आहे. त्याआधी लोकसभा निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण, ही निवडणूक आपण जिंकलो तर विधानसभा निवडणुकीला तसाही काही अर्थ राहत नाही.

अजित पवार आणि शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले, सरकार आलं की इकडे कसं होतं ते बघा. जी माणसं पळाली ही माणसं कशी दारात उभी राहतात ते दिसेल. हे फक्त सत्तेसाठी आणि ज्या चोऱ्या केल्या आहेत त्या दडविण्यासाठी आणि तुरुंगातून बाहेर राहण्यासाठी सत्तेत गेले आहेत. यानंतर आता शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांकडून या टीकेवर काय उत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माढ्याचा पुढला खासदार काँग्रेसचाच! काँग्रेस नेत्याच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ

माढ्यासाठी काँग्रेसची फिल्डिंग

दरम्यान, देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या नेतृत्वात 45 जागा निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतानाही काँग्रेसची गाडी मात्र सुसाट निघाली आहे.

काँग्रेस निरीक्षक आणि वरिष्ठ नेते दौरे करत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या मतदारसंघात आता काँग्रेसचाच खासदार असेल असे म्हणत चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या जागेवर दावा ठोकला होता.

Tags

follow us