Download App

आधी चव्हाण, आता पटोलेंची दिल्लीवारी; काँग्रेसमध्ये पुन्हा खांदेपालट होणार?

Maharashtra Congress : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. नेतेमंडळींच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या गोटातही जोरदारी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) दिल्लीत जाऊन आल्यानंतर लगेचच नाना पटोले (Nana Patole) यांनी सुद्धा दिल्ली गाठली आहे. मागील दोन दिवसांपासून ते दिल्लीत तळ ठोकून आहेत.

काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद अन् खांदेपालटाची मालिका जोरात सुरू आहे. मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठीच राज्यातील नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात काँग्रेसमध्ये आणखी मोठे फेरबदल होतील याची शक्यता बळावली आहे.

आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी

तसे पाहिले तर राज्यातील काही नेते नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत. या नेत्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर अशोक चव्हाण देखील दिल्लीला गेले होते. चव्हाण दोन दिवस दिल्लीत होते. येथे त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर पटोलेंचे समर्थक देखील दिल्लीत जाऊन आले. आता पटोले स्वतःच दिल्लीत गेले आहेत.

पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचे धोरण घेतले आहे. पण याला काही नेत्यांचा विरोध आहे. सध्याची परिस्थिती पाहता निवडणुका एकत्रच लढाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. पटोले हे राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. ऐन मोदीलाटेत त्यांनी मोदींवर टीका करत भाजपला रामराम ठोकला होता. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते प्रदेशाध्यक्षपद सांभाळत असले तरी राज्यातील अनेक नेते त्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.

पवारांना मी धमकी दिली नाही; सुप्रिया सुळें अन् रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा करणार : सौरभ पिंपळकर

Tags

follow us