Devendra Fadnavis : राज्यातील पावसाळी अधिवेशन संपले आहे. संसदेचे अधिवेशन अजून सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर संसदेच रोजच खडाजंगी सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयएए लीडरशीप अॅवॉर्ड्सच्या निमित्ताने मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत फडणवीस यांनी विविध प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली. इंडियन एक्सप्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली.
‘शिंदे साहेब, सत्तेची नशा…’ आमदाराच्या धमकीनंतर पत्रकाराला मारहाण, रोहित पवारांचं टीकास्त्र
लक्षात राहण्यासाठी आरडाओरडा करण्याची पद्धथ रुढ होतेय का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, कधीकधी सेन्सेशन निर्माण करावं लागतं. तु्म्हाला प्रत्ये वेळी आरडाओरडा करण्याची गरज नाही. तुम्ही हुशार पाहिजेत. स्मार्ट कम्युनिकेशन म्हणजे काही सेन्सेशन निर्माण करावे लागतात. त्याला कृतीची जोडही गरजेची आहे. अन्यथा लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.
ब्रँड पॉलिटिशनबाबत त्यांना मत विचारण्यात आलं. त्यावर फडणवीसांनी दिलेल्या उत्तराने मात्र उपस्थितांत चांगलाच हशा पिकला. स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या चित्रपटात सावकार हे खलनायक असायचे. शोलेच्या काळात डाकू खलनायक असायचे. त्यानंतर तस्कर खलनायक असायचे. आजकालच्या चित्रपटांत दोनच खलनायक दिसतात. एक तर राजकारणी किंवा मग पोलीस. त्यामुळे राजकारण हे ब्रँड बिल्डिंगच आहे.
खान्देशातील बडा नेता भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर; पवारांची साथ सोडलेला माजी आमदार करणार प्रवेश?
जे लोक सातत्याने निवडणुका जिंकतात. लोक ज्यांना पाठिंबा देतात ते राजकारणी उत्तम संवाद साधणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर कम्युनिकेटर आहेत. ते शेवटच्या माणसाशी सुद्धा संवाद साधतात. मला वाटतं हे ब्रँड मोदी आहे. या देशात अनेक नेत्यांनी अशाच पद्धतीने आपला ब्रँड विकसित केला आहे. आताच्या राजकारणात तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही कोणत्या प्रकारच्या रिल्स बनवता, लोक तुमच्याबद्दल कोणत्या रिल्स पाहतात यावरून ठरतं.