Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर प्रत्युत्तर देण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सरसावले असून त्यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांच्या पक्षाची राज्यात आणि देशात सत्ता आहे तेव्हा आता त्यांनी आपल्या पदाचा उपयोग करून समाजाला न्याय मिळवून द्यावा, असा सल्लाही देशमुख यांनी दिला.
‘अजितदादा सोबत आले अन् माझं खातं… महाजनांनी सांगितलं खातेवाटपाचं सत्य
देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, भाजपाच्या काळात ओबीसींवर अन्याय होत आहे. त्याकडे बावनकुळेंचे लक्ष नाही. जातीनिहाय जनगणनेचा समाजाला लाभ होईल. यानंतरही या मागणीची दखल घेतली जात नाही. प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह 15 ऑगस्टआधी सुरू करणार होते. या घोषणेला वर्ष झालं. तरी एकही वसतिगृह सुरू केले गेले नाही. ओबीसींसाठी घरकुल योजना आणली. त्याचाही लाभ एकाही घटकाला मिळाला नाही. बांधकामासाठी फक्त एक लाख 20 हजार रुपये निधी देण्यात आला. बांधकामासाठी पैसे नसल्याने सव्वा दोन लाख घरे अपूर्ण आहेत. बांधकामाच्या निधीत वाढ करण्यासाठी बावनकुळे आणि त्यांचे सरकार लक्ष देईल का, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.
‘महायुती सरकार घरी बसणारं नाहीतर लोकांच्या दारी जाणारं’; शंभूराज देसाईंचं ठाकरेंना प्रत्युत्तर
ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी इतरांना दुषणे देणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे समाजाबद्दल असणारे प्रेम पुतणा मावशीचे आहे, असा टोला देशमुख (Anil Deshmukh) यांनी लगावला. देशमुख यांच्या वक्तव्यानंतर आता त्याला बावनकुळे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.