Download App

राजू शेट्टींना शरद पवारांचा भरवसाच नाही; म्हणाले, मला त्यांच्याबाबत..

Raju Shetti on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीची चर्चा संपता संपत नाही. या भेटीवर दोन्ही नेत्यांनी खुलासा केल्यानंतरही राजकारणात चर्चा सुरूच आहेत. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी भाष्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्याविषयी मला शंका वाटते असे शेट्टी म्हणाले. नातेसंबंध असले तरीही त्यात स्पष्टता हवी. मात्र पवारांच्या भूमिकेत सध्या स्पष्टता दिसत नाही. त्यांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले. आमचा महाविकास आघाडीचा अनुभवही वाईट असल्याचं त्यांनी सांगून टाकलं.

सत्तेसाठी अनेकांनी विचारांशी फारकत घेतलीय; जयंत पाटलांचं टीकास्त्र

इंडिया आघाडीच्या बैठकीवरही केले भाष्य

देशातील प्रमुख विरोधी पक्षांची इंडिय आघाडी तयार झाली आहे. बंगळुरूनंतर आता या पुढील बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीची तयारी सुरू आहे. या बैठकी सहभागी होणार का, या प्रश्नावरही राजू शेट्टी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला होता. बच्चू कडूंच्या मनात यायला उशीर झाला. पण, उशीरा का होईना त्यांनी योग्य निर्णय घेतला. लहान पक्षांवर लोकांचा विश्वास आहे. आम्ही चळवळीत काम करणारे लोक आहोत. आमचा रस्ता नेहमीच काटेरी राहिलेला आहे.

मी ‘त्या’ प्रश्नांची उत्तरे देणारच

रविकांत तुपकरांच्या मुद्द्यावरही शेट्टी यांनी भाष्य केले. मला जरी पत्र लिहीले गेले असले तरी निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही. त्यांचे पत्र मी समितीकडे पाठवले आहे. समितीने मलाही काही प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मी देणारच आहे. त्यात मला अपमान वाटत नाही असे शेट्टी म्हणाले. त्यांच्या या उत्तरानंतर पुढील वाटचाल कशी राहणार आहे, याचा अंदाज येतो.

 

Tags

follow us