Download App

Diamond Hub: विरोधक सरकारला टार्गेट करताहेत, डायमंड हब मुंबईतच होणार; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

  • Written By: Last Updated:

Uday Samant On Diamond trading center : गुजरातमधील सुरत येथील हिरे व्यापाऱ्यांनी (diamond merchant from Surat) 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र (Diamond trading center) तयार केलं. त्यामुळे वर्षानुवर्षे मुंबईत असलेला हिऱ्यांचा व्यवसाय आता गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या सर्व घडामोडींवर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाष्य केलं.

Sharad Pawar : पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ‘इंडिया’ आघाडीत सर्वकाही आलबेल नाही 

मुंबई आणि सुरत या शहरांत हिरे उद्योगासाठी स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळेच सुरतमध्ये सूरत डायमंड एक्सचेंज बोर्स सुरू होत असतांना महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहे. यावर आज पत्रकार परिषदेत बोलतांना उदय सामंत म्हणाले की, येत्या वर्षभरता नवी मुंबईत देशातील सर्वांत मोठं डायमंड सेंटर सुरू होणार आहे. त्यासाठी धोरणही तयार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी 100 कोटींचा निधीही दिला. त्यामुळं हा डायमंड गुजरातला जाण्याचा प्रश्नच नाही. डायमंड हिरे ज्वेलरी हब नवी मुबंईतच होईल. अन्य लोक केवळ सरकारला टार्गेट करून बोलत आहे. गैरसमज निर्माण करत आहेत, असं सामंत म्हणाले.

ते म्हणाले, विरोधकांना उद्योग विश्वाविषयी कळवला असेल तर मग सचिन वाझे यांना पोलिस अधिकारी कोणी केलं? नुसतं पोलीस अधिकारी करून थांबले नाहीत. तर अंबानींच्या घराखाली जिलेटीन ठेवायला सांगिलतं. सचिन वाझेबद्दल अग्रलेख छापून आला होता. वाझेंची शिफारस करणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे. उद्योगजकांच्या घराखाली जिलेटीन ठेवल्या जात असतील तर महाराष्ट्रात उद्योग करण धोक्याच असल्याचं उद्योजक सांगतात. मात्र, शिंदे सरकारच्य काळात परदेशी गुंतवणूक राज्यता वाढली आहे, असं सामंत म्हणाले.

गेल्या दिड महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणसाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. यावरही सामंत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मराठा समाज आक्रमक झाल्यानं वातावरण बिघडत चाललयं. मात्र, मराठा समाजाला टीकणारं आरक्षण द्यायचं आहे. ते आमचं सरकार देईल. शिंदे-फडणवीस-अजितदादा हेच मराठी समाजाला आरक्षण देऊन दाखवतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं सामंत म्हणाले.

यावेळी त्यांनी महाविकास आडाडीवर टीकाही केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र, प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा सरकार बदललं. मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टाला पटवून देण्यात सरकार कमी पडलं. त्यामुळं आरक्षणाचा मुद्दा कोर्टात टिकला नाही, नाहीतर तेव्हाच आरक्षण मिळालं असतं, असं सामंत म्हणाले.

Tags

follow us