Sharad Pawar : पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ‘इंडिया’ आघाडीत सर्वकाही आलबेल नाही

  • Written By: Published:
Sharad Pawar : पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ‘इंडिया’ आघाडीत सर्वकाही आलबेल नाही

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी (Sharad Pawar) आज (दि. 28) पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावेळी त्यांनी मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या विरोधाकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) सर्वकाही आलबेल नसल्याचा मोठा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी एकत्रित आलेल्या पक्षांमध्ये सहमती आहे, मात्र विधानसभा निवडणुकीबाबत मतभेद असल्याचे पवारांनी यावेळी म्हटले आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आंबेडकर यांना आघाडीत घेण्याबाबात चर्चा झाली नाही, पण सहकाऱ्यांशी चर्चा केली. (Sharad Pawar On India Alliance )

Maratha Reservation आंदोलकांना तानाजी सावंतांचा चकवा; दुसऱ्या हेलिपॅडवरून पोहचले तुळजापुरात

लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी सर्व पक्षांमध्ये परस्पर सहमती आहे, मात्र पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या जागा वाटपावरून मतभेद आहेत. आम्ही यावर चर्चा करून तोडगा काढू असा विश्वासही यावेळी पवारांनी व्यक्त केला. अनेक राज्यांतील लोक बदल घडवून आणण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मतभेत कशावरून?

पुढील महिन्यात देशाती पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी प्रमुख पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. यातच मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान, इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील मतभेद समोर आले आहेत. या ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुका जसे आम्ही एकत्रित लढण्यावर सर्व पक्षांची सहमती आहे. मात्र, विधानसभ एकत्र लढवायच्या की नाही याबाबत मतमतांतर आहेत. मात्र, यावर येणाऱ्या काळात चर्चा करून आम्ही तोडगा काढू असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे.

Chhattisgarh Election : केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, कर्जमाफीही देणार…; राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा

सध्या देशात अशांततेचे वातावरण आहे. अनेक राज्यातील लोक बदलाचा विचार करत आहेत. लोकांना बदल हवा आहे. देशाचे चित्र पाहिले तर काही ठिकाणी मोदी किंवा त्यांचा पक्षच सत्तेत आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बदल होण्याची शक्यात आहे. मात्र, लोकसभेची माहिती घेतल्याशिवाय आपण काहीही बोलणार नसल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले.

रविवारी दिल्लीला जाणार

उद्या (दि. 29) आपण दिल्ली येथे जाणार असल्याचे सांगत इंडिया आघाडीतील काही पक्ष आणि नेते मंडळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर चर्चा करणार आहेत. या बैठकीत उपस्थित झालेल्या समस्येवर चर्चा करून तोडगा काढण्यावर आमचा भर असेल असेही पवारांनी यावेळी सांगितले.

वंचितला सोबत घेण्यास पवार इच्छूक

यावेळी विरोधकांच्या इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला सोबत घेणार का? यावर पवार म्हणाले की, आंबेडकर यांना आघाडीत घेण्याबाबात चर्चा झाली नाही, पण सहकाऱ्यांशी चर्चा केली. यायचे की नाही हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पण वंचितला सोबत घेऊन पुढे जायला हवं असे आपले मत असल्याचा खुलासा यावेळी पवारांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube