Uday Samant : ‘कोणी कितीही आघाड्या केल्या तरीही मोदींना..,’; उदय सामंत ‘इंडिया’ आघाडीवर बरसले
Uday Samant : कोणी कितीही आघाड्या केल्या तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज देऊ शकत नसल्याचं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) ‘इंडिया’ आघाडीवर बरसले आहेत. मुंबईत आज उदय सामंत आणि खासदार राहुल शेवाळेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उदय सामंतांनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवर निशाणा साधला आहे.
India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’
उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, अजूनही विरोधकांकडून गद्दार खोक्यांच्या टीका करणं सुरुच आहे, मात्र आता गद्दार आणि खोक्यांचा विषय संपला असून चारा घोटाळ्यामध्ये ज्यांनी 1 हजार कोटींचे खोके खाल्लेत त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत, असा उपरोधिक टोलाही सामंत यांनी यावेळी लगावला आहे. तसेच इंडिया आघाडीतल्या 10 पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची कारवाई झालीयं, इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल तर त्यांनी एखादा उमेदवार जाहीर करावा, असंही ते म्हणाले आहेत.
‘इंडिया’च्या युतीला फाटा देत बसपाचा स्वबळावर लढण्याचा नारा; मायावतींची घोषणा
उदय सामंतांची(Uday Samant) उद्धव ठाकरेंवरही टीका :
इंडिया बैठकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जायला पाहिजे होतं, बाळासाहेबांचे आशिर्वाद घ्यायला हवे होते पण ज्यांच्या अजेंड्यात बाळासाहेबांचं नावच नाही, अशा लोकांसोबत आम्हाला सल्ले देणाऱ्या लोकांनी आघाडी केली आहे. नीतीश कुमार, लालूप्रसाद यादव, काश्मीरच्या नेत्यांनी बाळासाहेबांवर टोकाची टीका केली होती, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून ते राजकारण करीत आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेची काँग्रेस झाली असल्याचं उदय सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत.
Rakhi Sawant: उमराहवरून परतलेल्या राखीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “फातिमा नाही तर…”
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 375 पेक्षा अधिक जागांवर आमचाच विजय होणार असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत, तसेच विधानसभेच्या निवडणुकीत 215 पेक्षा अधिक आमदार महायुतीचे निवडून येणार आहेत, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांचं मुंबईत स्वागत आहे तुमच्या बैठकीचा काहीही परिणाम होणार नसून पर्यटनाला आलेल्या 65 नेत्यांना शुभेच्छा, असंही उदय सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत.
वडेट्टीवारांच्या आरोपांवर विखेंचा टोमणा! विजुभाऊ… जरा संयमाने भूमिका मांडा
मुंबई ही आमची महाराष्ट्राचीच :
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे, पण असं काही नाही महाराष्ट्रापासून मुंबई नक्की कोणाला तोडायची? हेच सारखं सारखं म्हणतात, यांचा तर डाव नाही ना? मुंबईसाठी जे काही करावं लागेल ते करण्याची शासनाची तयारी असून मुंबई कोणी तोडणारच नाही. मुंबई ही आमची महाराष्ट्राचीच राहणार हा भावनिक साद घालण्याचा प्रकार असल्याचंही उदय सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या कालच्या फोटोंवरुन असं दिसतंय की कोण मध्ये थांबलयं हेच कुणाचं कोणाला कळत नाहीये. त्यामुळेच अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरत नाहीये, आघाडीतल्या 65 नेत्यांना मीच मध्ये बसलोयं असं वाटावं, अशीच बैठक व्यवस्था करण्यात आल्याची टीकाही उदय सामंत यांनी केली आहे.