‘इंडिया’च्या युतीला फाटा देत बसपाचा स्वबळावर लढण्याचा नारा; मायावतींची घोषणा
देशभरात भाजपविरोधी पक्षाने वज्रमूठ बांधलेली असताना बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भाजपविरोधात असलेल्या इंडिया आघाडीत बसपा सामिल होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी होणाऱ्या 5 राज्यातील निवडणुका बसपा स्वबळावर लढणार आहे.
इंडिया आघाडीत जागावाटपाचा रनर-अप फॉर्म्युला; ठाकरे गट, राष्ट्रवादी अन् काँग्रेसला फायदा की तोटा?
या वर्षी होणार्या 5 राज्यांच्या विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (BSP) एकट्याने लढणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी बुधवारी ही घोषणा केली. मुंबईतील बैठकीपूर्वी विरोधकांनी मायावती यांच्याशी नव्या महाआघाडीत सामील होण्यासाठी संपर्क साधल्याची चर्चा होती.
Lumpy Skin : अहमदनगर जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित; आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
मागील काही दिवसांपासून भाजपविरोधात देशातले 28 पक्ष एकवटले आहेत. या आघाडीला इंडिया असं नावंही देण्यात आलं आहे. बसपादेखील भाजपविरोधी असल्याने इंडिया आघाडीत सामिल होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. NDA आणि INDIA युती हे बहुतांशी गरीबविरोधी, जातीयवादी, धनिकांचे समर्थक आणि भांडवलदार धोरणे असलेले पक्ष आहेत. ज्यांच्या धोरणांविरोधात बसपा लढत आहे. त्यामुळेच त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मायावती यांनी स्पष्ट केलं होतं.
‘सामना’च्या टीकेवर ठाकरेंसमोरचं शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘तुम्ही तुमचं काम…’
बसपा 2007 प्रमाणे लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका एकट्याने लढवणार असून विरोधकांच्या चालीरीतींऐवजी परस्पर बंधुभावाच्या आधारे कोट्यवधी उपेक्षित आणि तुटलेल्या समाजाला एकत्र करून एकट्याने लढणार आहे. माध्यमांनी पुन्हा पुन्हा गैरसमज पसरवू नयेत. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजीही मायावतींनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे युती न करण्याचे जाहीर केले होते.
बसपा प्रमुख मायावती यांनी मंगळवारी इम्रान मसूद यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्याच्यावर अनुशासनहीनतेचा आरोप आहे. बसपामधून हकालपट्टी केल्यानंतर सहारनपूरचे माजी आमदार काँग्रेस आणि त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे कौतुक करण्यात व्यग्र आहेत, त्यामुळे त्यांनी हा पक्ष का सोडला, असा प्रश्न लोकांना पडणे स्वाभाविक आहे. मग दुसऱ्या पक्षात का गेलात? अशा लोकांवर जनता कशी विश्वास ठेवणार? नसल्याचं मायावती म्हणाल्या होत्या.