Lumpy Skin : अहमदनगर जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्‍हणून घोषित; आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Lumpy Skin : अहमदनगर जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्‍हणून घोषित; आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Lumpy Skin : अहमदनगर जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जनावरांचे बाजार भरविण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या रोगाच्या अटकावसाठी व रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार नगर जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग बाधित क्षेत्र म्‍हणून घोषित केला आहे.

‘फाईल्स व्हाया फडणवीस जाणे म्हणजे अजितदादांचे पंख छाटणे नव्हे तर, बळ देण्यासारखे’

मंत्री विखेंच्या प्रशासनाला सूचना…

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील जनावरांमध्ये लम्पी (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. यामुळे प्रशासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवला जात असून याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला सूचना देखील दिल्या आहेत. दरम्यान आतापर्यंत 70 टक्के जनावरांना दुसरा डोस देण्यात आला असून, जनावरांमध्ये विषाणूचा नवीन प्रकार तयार झाल्याची चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारचे शास्त्रज्ञांचे पथक राज्यात बोलावून या रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.

INDIA Meeting : शरद पवार असणार पंतप्रधान पदाचे उमेदवार? संयोजक पदासाठी ऐनवेळी नाव चर्चेत

जनावरांचा बाजार बंद

नगर जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी (Lumpy Skin) आजाराने पुन्हा शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लम्पी या जनावरांच्या साथरोगाचा संसर्ग वाढला आहे. अनेक तालुके हे लम्पीबाधित होत असल्याने आता प्रशासनाने उपाययोजना म्हणून तसेच या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. नुकताच शेवगाव तालुक्यात रविवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद ठेवणायचे आदेश प्रशासनाने दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube