Jitendra Awhad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दादरमध्ये त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. आव्हाड यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, राज ठाकरेंना शुभेच्छा. आता त्यांच्याकडे एकच आमदार आहे. हा आकडा त्यांना 50 ते 60 पर्यंत न्यावा लागेल. नुसत्या नकला काढून ते होणार नाही.
रेशीमगाठी पुन्हा जुळून येणार! सेना-भाजपमधील वादावर देसाईंचा ‘रामबाण’ उपाय
ते पुढे म्हणाले, राज ठाकरे यांनी कृतीशील कार्य करावे, फक्त लोकांच्या नकला व टोमणे मारणे कमी करावे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
शिंदे गटाने काल आणि आज दिलेल्या जाहिरातींवरही त्यांनी टीका केली. या दोन जाहिरातींवर दोन दिवसात किमान दहा कोटी रुपये खर्च झाले. एवढे पैसे हे आणतात तरी कुठून? ज्यांनी बोटाला धरून त्यांना या पदावर बसवलं, त्यांचीच अशी अवहेलना करणे हे त्यांना शोभत नाही.देवेंद्र फडणवीस हे नेहमीच त्यांना सांभाळून घेत असतात. तेव्हा कुणी काही म्हणाले तरी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा निश्चितच मोठे नेते आहेत, असे आव्हाड म्हणाले.
https://letsupp.com/maharashtra/supriya-sule-warns-bjp-leader-that-she-will-come-to-delhi-and-hold-a-program-57416.html