Download App

‘या’ दिवशी होणार विधान परिषद सभापती निवडणूक, भाजपकडून राम शिंदेंना संधी?

Maharashtra Legislative Council : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक कधी होणार

  • Written By: Last Updated:

Maharashtra Legislative Council : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक गुरुवारी होणार असल्याची माहिती दिली आहे.

शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे यांना सभापतीपदाची पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचा दावा शिवसेनेकडून (Shiv Sena) करण्यात येत आहे तर दुसरीकडे भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना अध्यक्षपदासाठी संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत तर सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे या पदावर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या पदासाठी भाजपकडून राम शिंदे यांचं नाव जवळपास फिक्स झालं असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, भाजपकडून विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करणार आहेत.

विधान परिषदेत कोणाचे किती सदस्य आहेत?

रामराजे नाईक-निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 7 जुलै 2022 पासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. सभागृहातील 78 सदस्यांपैकी भाजपचे 19, काँग्रेसचे 7, शिवसेना (ठाकरे गट) 7 , शिवसेना (शिंदे गट) 6, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गटाचे) पाच – पाच सदस्य आहे. तर 3 अपक्ष सदस्य आहे.

कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथील कराव्यात, आमदार सत्यजीत तांबेंची मागणी

राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ऑक्टोबरमध्ये राज्यपालांच्या कोट्यातील 12 रिक्त जागांपैकी सात जागांसाठी विधान परिषदेचे सदस्य म्हणून सात नावांना मंजुरी दिली होती.

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका, सेन्सेक्स1064 अंकांनी घसरला, ‘हे’ आहे कारण

follow us