“त्यांना आता पोटदुखी, डोकेदुखी अन् कावीळ…” नीलम गोऱ्हेंचा विरोधकांवर घणाघात
Pune News : राज्य सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून आता विरोधकांना इतके पैसे कशाला देता असे म्हणत योजनेवर टीका केली जात आहे. पण त्यांना इतकी पोटदुखी होण्याचं काय कारण, असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी केला.
नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, दुसऱ्या कुठल्या योजनेला दिले असते तर चालले असते. ही योजना आल्यापासून अनेकांना पोटदुखी, कावीळ, डोकेदुखी असे विकार जडले आहेत. कावीळ झाल्याप्रमाणे त्यांच्याकडून या योजनेवर टीका केली जात आहे. जगात महिलांची संख्या निम्मी आहे. पण श्रमांचे तास मोजले कोण किती काम करतं हे जर पाहिलं तर त्यास दोन तृतीयांश तास महिलांचे कष्ट आहेत. पण एकूण उत्पन्नाच्या फक्त दहाच टक्के मोबदला त्यांना मिळतो. महिलांच्या नावावर जगातली फक्त एक टक्का संपत्ती आहे. त्यात सरकारने थोडी का होईना भर घातली तर विरोधकांच्या पोटात दुखण्यासारखं काही नाही. तुम्ही तर एक पैसाही दिला नाही उलट त्यांची फसवणूक केली.
लाडकी बहीण योजनेकडे व्यापारी पद्धतीने पाहू नका; नीलम गोऱ्हेंचे विरोधकांवर टीकास्त्र
मला आजच कळलं की एका व्यक्तीने तो स्वतःला नगरसेवक म्हणवतो. त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला की तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचे आहे तेही पैसे काढून घेतले जातील. अशा लोकांना समाजकंटक म्हणून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.
महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, ज्यावेळी या योजनेची घोषणा झाली. त्यावेळी योजनेबाबत अफवा आल्या. तरीही मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसहीत राज्यातील महिलांनी ही योजना यशस्वी करुन दाखवली. या योजनेत सध्या एक कोटी 35 लाख लाभार्थी पात्र ठरले. आज आपण एक कोटी 8 लाख महिलांना पैसे थेट डिबीटी द्वारे पैसे देऊ शकलो. हे खूप मोठं यश आहे. त्यामुळे नकारात्मक चर्चांचा विचार करू नका. आजचं पाऊल सकारात्मक आहे. महायुतीच्या सरकारचं उद्दीष्ट अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचं आहे.
हिंमत असेल तर कार्यक्रमाला न येणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म.. सुप्रिया सुळेंचा थेट सरकारला इशारा