Download App

Girish Mahajan : बंडखोरीवरून जुंपली! “बंडखोरांना रोखता येत नाही”; महाजनांचे गुलाबरावांना प्रत्युत्तर

Girish Mahajan vs Gulabrao Patil : राज्यात ऐन निवडणुकीआधी महायुतीत धुसफूस सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. तर काही जागांवरून तर दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. यामध्ये माजी मंत्री रामदास कदम आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर (Gulabrao Patil) आहेत. आताही पुन्हा पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाक् युद्ध सुरू (Girish Mahajan) झाले आहे. भाजपाच्या राजकारणावर गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले, मागील वेळी ज्या गोष्टी घडल्या त्या पुन्हा घडू नयेत यासाठी आमच्या महाराष्ट्र पातळीवरील नेत्यांच्या बैठका झाल्या आहेत. या बैठकीत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की मागच्या निवडणुकीत आम्ही भाजपसाठी काम केलं. मात्र भाजपने विधानसभेत बंडखोर उमेदवार उभे केले. त्याची पुनरावृत्ती आता होऊ नये.

आता या लोकसभा निवडणुकीत आम्ही अतिशय मन लावून काम करत आहोत. तेव्हा सहाजिकच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला त्यांनी मदत केली पाहिजे. मागील काळात ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या आता पुन्हा घडणार नाहीत असे आश्वासन आम्हाला वरिष्ठांनी दिले आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Girish Mahajan : राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप; महाजनांच्या दाव्याने खळबळ !

यानंतर गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. मागच्या वेळी भाजपने कुठेही बंडखोर उमेदवार उभे केले नाहीत. बंडखोर उमेदवार कुठे उभे राहत असतील तर त्यांना आवरता येत नाही. तरीदेखील यावेळी बंडखोरी होणार नाही याची काळजी घेऊ, असे गिरीश महाजन म्हणाले. राज्यातील जागावाटपावर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली आहे. 90 ते 95 टक्के जागावाटप पूर्ण झाले आहे. एक ते दोन जागांवर तिढा आहे त्यावरही दोन दिवसांत मार्ग काढला जाईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

follow us

वेब स्टोरीज