Maharashtra Mansoon Session : राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता सोमवारी आणि मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आलीयं. त्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडलं आहे. विधानभवनाबाहेर नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…
नाना पटोले म्हणाले, अधिवेशनाच्या कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस कामकाज होणार नाही. या दिवशी सुट्टी देण्याचा घेतला आहे. हा निर्णय़ कशासाठी घेण्यात आला, याचे सविस्तर स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलेलं नसल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, जनतेचे अनेक प्रश्न असून जनतेच्या प्रश्नांवर अधिवेशनात पूर्णवेळ चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. राज्यात सध्या अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पुराचंही सावट असल्याचं दिसून येत आहे. अशातच शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांच्या प्रश्नांची राज्य सरकारला चिंता नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
पाकिस्तानवर उपासमारीची वेळ, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 99व्या क्रमांकावर घसरण
राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन राज्य सरकारला दिल्लीतून येणाऱ्या ‘आका’ची अधिक चिंता असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. दरम्यान, पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठीच अधिवेशनाच्या कामकाजाला सुट्टी दिल्याचा अप्रत्यक्ष आरोपच नाना पटोले यांनी केला आहे.
यावेळी बोलताना नाना पटोलेंनी नागपुरच्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. जशी नागपुरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती आहे तशीच राज्यात असल्याची टीका त्यांनी केली आहे.