Chhagan Bhujbal : ‘शरद पवार यांचे फोटो दाखवून मते मिळवा असे मी कुठेही म्हणालेलो नाही. चिन्हावर मत द्या असेच सांगतो. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं आहे. कारण, निवडणूक आयोगाने ते दिलं आहे. चिन्ह दाखवून प्रचार करण्याची वेळ अजून आलेली नाही. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तरी देखील सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार गटाकडून होत आहे’, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. छगन भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ ग्रामीण भागात शरद पवारांचे फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मते मिळवा असे सांगतात, असे शरद पवार गटाचे वकिलांनी सांगितले होते. त्यानंतर माध्यमांतही तशा बातम्या आल्या होत्या. यावर आज भुजबळांनी स्पष्टीकरण दिले.
भुजबळ पुढे म्हणाले, निवडणूक आली की चिन्ह वापरणारच. कारण चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने दिलं आहे. पण मी स्वतः अजून तरी चिन्ह आणि फोटोचा वापर करून कुठेच मते मागितलेली नाहीत. ग्रामीण भागात शरद पवारांचे फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मते मिळवा असे मी कुठेही म्हणालेलो नाही. किंबहुना अजून कोणती निवडणुकही जाहीर झालेली नाही. निवडणूक बॅनरवर अनेकांचे फोटो असतात ती गोष्ट वेगळी.
Supriya Sule : “दमदाटी केली तर गाठ माझ्याशी”; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला खणखणीत इशारा
सर्वसाधारणपणे आपण असेच म्हणतो की आमच्या पक्षाचं चिन्ह पहा आणि मतं द्या. पण यांचाच फोटो पाहून मत द्या असं म्हणायचं मग काय त्यांचा फोटो तिथे (मतदान केंद्र) असतो का? अजून हा प्रचार करण्याची वेळच आलेली नाही. पण फक्त माझं नाव घेण्यात आलं. बातम्याही तशाच आल्या म्हणून मला बोलावं लागलं, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
पवार साहेबांनी कांद्याला हमीभाव का दिला नाही ?
चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात कांद्याच्या हमीभावारून शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्यांच्या याच टिकेला भुजबळांनी प्रत्युत्तर दिले. कृषिमंत्री असताना पवार साहेबांनी कांद्याला हमीभाव का दिला नाही. त्यांनी हमीभाव दिला असता तर हा प्रश्न आज आलाच नसता. का नाही केलं त्यांनी. पवार साहेब केंद्रात कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव अनेक वेळा पडत होते. त्यावेळी काहीतरी उपाययोजना केली जात होती भावात सुधारणा केली जात होती. हे मी देखील मान्य करतो.
निलेश लंकेंना मदत लागल्यास आम्ही तयार; शरद पवारांचा लंकेंना शब्द
आताही आमचे महायुतीतील नेतेमंडळी केंद्रातील संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या गोष्टीची माहिती देत असतात. त्यानुसार मग केंद्र सरकारकडूनही निर्णय घेतले जातात. कांदा निर्यात केली जाते. परंतु, यातून शेतकऱ्यांना आधी जितके पैसे मिळत होते तितके आज मिळत नाहीत हे मला देखील मान्य आहे. पण, हमीभावाचं जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही (शरद पवार) कांद्याला हमीभाव द्यायचा होता ना.