MLC Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीआधी (MLC Election 2024) विधानपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानपरिषदेतील 11 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून मोठे डाव टाकले जात आहेत. आताची बातमी महाविकास आघाडीची आहे. मविआचे घटकपक्ष शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील निवडणुकीत (Jayant Patil) उतरणार असून त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गटाने (Sharad Pawar) पाठिंबा दिला आहे. परंतु, ठाकरे गटाने अद्याप पत्ते उघड केलेले नाही.
दुसरीकडे उद्धव ठाकरे रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Uddhav Thackeray) मतदारसंघात मोठा डाव टाकण्याच्या (Ratnagiri Sindhudurg Constituency)तयारीत आहेत. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले विनायक राऊत यांचं (Vinayak Raut) पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे.
Narayan Rane : माझ्यावर टीका करतो, एक दिवस चोप देणार; भास्कर जाधवांना थेट नारायण राणेंची धमकी !
विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. अकराव्या जागेवरून जयंत पाटील निवडणुकीत उतरू शकतात. त्यांना शरद पवार गट आणि काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. मात्र ठाकरे गटाने पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. कारण या जागेवरून ठाकरे विनायक राऊत यांना उतरवण्याचा विचार करत आहेत.
ठाकरे गटाने जर राऊत यांना संधी दिली तर या निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते. तीन जागा निवडून आणायच्या असतील मविआला 69 मतांची गरज आहे. परंतु, या आघाडीतील तिन्ही पक्षांचं मिळून 65 संख्याबळ आहे. शेकाप आणि अपक्ष आमदारही सोबत आहे. परंतु, जयंत पाटील स्वतःच निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याने ते आता आघाडीला पाठिंबा देणार नाहीत. अशा परिस्थितीत जर मविआने विनयाक राऊत यांना संधी दिलीच तर मतांची जुळवाजुळव कशी करायची हा मोठा प्रश्न आघाडीसमोर राहिल. त्यामुळे आता महाविकास आघाडी जयंत पाटलांना पाठिंबा देणार की विनायक राऊतांना संधी देणार याचं उत्तर लवकरच मिळणार आहे.
दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघात मविआ उमेदवाराच्या पराभवाला मी एकटा जबाबदार नाही. आम्ही येथे ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र जनतेने तो कौल दिला आहे. त्या निवडणुकीचा आणि आताच्या विधानपरिषद निवडणुकीचा काहीच संबंध नाही. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा मलाच पाठिंबा राहिल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
शेकापचा दिवा फडफडतोय.. तरीही जयंत पाटील चौथ्यांदा आमदार होतायत!
महायुती
भाजप 103
शिंदे गट 37
राष्ट्रवादी अजित पवार 39
अन्य पक्ष 9
अपक्ष 13
एकूण 209
—
मविआ
काँग्रेस 37
ठाकरे गट 15
राष्ट्रवादी शरद पवार 13
शेकाप 1
अपक्ष 1
एकूण 67
एमआयम 2, सपा 2, माकप, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक असे एकूण 6 आमदार तटस्थ आहेत.