Download App

सहा जिल्ह्यांसाठी एकच पालकमंत्री, तुम्हाला अधिकार काय? पटोलेंचा मुनगंटीवारांवर हल्लाबोल

Assembly Session : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार चकमक उडाली. मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. थोरात यांनी डबल इंजिनचे ट्रिपल इंजिन झाल्यावरून सरकारला चिमटा काढला. त्याला प्रत्युत्तर देत विरोधी पक्षनेता अजूनही का नेमला नाही, असा खोचक मंत्री मुनगंटीवार यांनी केला. त्यावर नाना पटोले यांनी आक्रमक होत सहा-सहा जिल्ह्यांत एकच पालकमंत्री का आहेत, असा सवाल केला.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत; वाचा कुणाला किती रक्कम मिळणार

सभागृहात आज या तिन्ही नेत्यांत चांगलेच शाब्दिक वाद पाहण्यास मिळाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदन दिल्यानंतर काँग्रसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यावर चांगलेच चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांचे निवेदन हे मुक्तछंद होते. डबल इंजिनचे ट्रिपल इंजिन झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, सगळा महाराष्ट्र पाहतोय की कोणतं इंजिन कुणाला ढकलतंय त्या गाडीचं काय होणार, असा खोचक सवाल थोरातांनी केला.

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमाचा आता लाभार्थ्यांना त्रास होत आहे. लोकांना वाईट अनुभव येत आहे. सहा महिन्यांपासून प्रमाणपत्र रोखून धरण्यात आल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

Ram Shinde : ‘मी लढणार, 2024 ला दाखवूनच देणार’; शिंदेंचा पवारांविरुद्धचा प्लॅन ठरला!

विरोधी पक्षनेता का नेमला नाही – मुनगंटीवार

त्यानंतर सुधीर मुनगंटीवारही विरोधकांवर तुटून पडले. शेतकरी हिताचे निर्णय मुख्यमंत्री जाहीर करत असताना थोरात यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केले त्याचा निषेध केला पाहिजे. माझाही पॉइंट ऑफ इन्फर्मेशन आहे. विरोधी पक्षनेता आतापर्यंत का झाला नाही. विरोधी पक्षनेता जाहीर न करता सरकारच्या निर्णयाला विरोध करणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, असे प्रत्युत्तर दिले.

नाना पटोलेंनीही सुनावले

त्यानंतर नाना पटोले यांनी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा उपस्थित केला. पण माझा मुद्दा असा आहे की सहा-सहा जिल्ह्यांसाठी एकच पालकमंत्री आहे. आज राज्यात भीषण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाला आरोप करण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल पटोलेंनी केला.

Tags

follow us