Download App

आम्हाला शिकवणाऱ्यांनी आधी रामायण वाचावं; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला

Shrikant Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांनी त्यांच्या दौऱ्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी रावणराज्य करणारे अयोध्येला चालले असल्याची टीका केली होती. या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कारभार चांगला चालल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा आहे आणि आता उपमुख्यमंत्री सुद्धा येत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. भाजपचे सगळे लोक आले आहेत. आम्ही सगळे एकत्र रामाचे दर्शन घेणार आहोत.

Deepak Kesarkar : लोकांची सेवा कशी करायची हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही

दौऱ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी रामायण वाचावे आणि नंतर टीका करावी. रावणराज्य कोण चालवत होतं आणि आता रामराज्य कोण चालवत आहे ? हे लोकांना बरोबर माहिती आहे. गेले अडीच वर्षात ज्यांना हनुमान चालीसा वाचायची होती त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं. तुम्ही साधुंचं हत्याकांड झाले त्यांना पकडू शकले नाहीत. दाऊदचा ज्यांच्याशी संबंध होता ते मंत्री मंत्री म्हणून जेलमध्ये गेले. त्यांचे मंत्रीपदही आपण काढून घेऊ शकला नाहीत असे म्हणत हे रामराज्य आहे का असा सवाल शिंदे यांनी केला.

तुमचे गृहमंत्री जेलमध्ये गेले यापेक्षा मोठे दुर्भाग्य काय असणार ?  आणि हे आम्हाला शिकवणार रावणराज्य आणि रामराज्य ? मला वाटतं यांनी रामायण एकदा चांगल्या प्रकारे वाचले पाहिजे. मी डायलॉगबाजी ऐकली ‘रघुकूल रीत सदा चली आई, प्राणी जाए पर वचन ना जाई’  मला वाटतं वचन कोणी तोडले ? बाळासाहेबांचे वचन कोणी तोडले ?  रामाने तर वडिलांच्या वचनाखातर वनवास पत्करला. कोणताही कलह होऊ नये म्हणून ते वनवासात गेले. पण यांनी काय केले? स्वतःच्या भावाला घराबाहेर काढले. कोणालाही एकत्र ठेवले नाही. परिवारामध्ये कोण आहे यांच्या ? हे कुठले रामराज्य ? आणि हे आम्हाला सांगताहेत रावणराज्य करणारे तिकडे चाललेत.’

काळी टोपी, खाकी पँट आणि प्रिंटेड टी-शर्ट… नरेंद्र मोदींच्या वेगळ्या लूकची चर्चा

 

‘यांच्या सरकारच्या काळात कोणी बोललं त्याला जेलमध्ये टाका ही पद्धत होती. अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकले. मग हे रामराज्य आहे का ?’  असा जळजळीत सवाल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

Tags

follow us