Deepak Kesarkar : लोकांची सेवा कशी करायची हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही

Deepak Kesarkar : लोकांची सेवा कशी करायची हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही

Eknath Shinde on Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार, खासदार आयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) गेले आहेत. या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टीका केली आहे. राज्यात अवकाळी पावसाचे संकट असताना शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडून दौरा करत आहेत. पवारांच्या टीकेला मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दीपक केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर महाविकास आघाडी सोडत होती. आम्ही कधीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. शेतकऱ्यांना आमच्या काळात जेवढी मदत झाली तेवढी मदत कधीही झालेली नाही. सातत्याच्या पावसाने शेतकरी ज्यावेळी हैराण होतो त्यावेळी त्याला दिलासा देण्याची भूमिका महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घेतली नाही. ती भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे, असे केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक

भूविकास बँकेचा प्रश्न कितीतरी दिवस पडलेला होता. त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. त्यांच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांची मोठी परवड झाली होती पण आमच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तातडीने मिटवला आहे. त्या कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय दिला आहे. लोकांची कशी सेवा करायची हे आम्हाला शिकण्याची गरज नाही, ते आम्ही करुन दाखवलं आहे, अशी टीका शरद पवार यांच्यावर केली आहे.

ते पुढं म्हणाले, लोकांची सेवा करणारे राज्य असते त्याला रामराज्य म्हणतात. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन द्यायचे असेल तर आम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवतो त्या देवतेच दर्शन घेतले तर काय बिघडलं? असा सवाल केसरकर यांनी केला आहे. शरद पवार यांचा सल्ला आम्ही नेहमी घेत असतो राज्याचे ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी राज्याची चांगली सेवा केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगावं, असे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube