Download App

Nitesh Rane : राणेंनी दाखवला ‘तो’ जीआर; म्हणाले, आता पोहरादेवीची माफी कोण मागणार?

Nitesh Rane vs Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे खोटे बोलले असा आरोप करणे हा पोहरादेवीचा अवमान आहे. पोहरादेवीची खोटी शपथ घेणार नाही. ते जागृत देवस्थान आहे. फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली होती.

त्यांच्या याच टीकेवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राणे म्हणाले, आज सकाळी संजय राऊत यांनी उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवीची माफी मागावी अशी मागणी केली. ४ डिसेंबर २०१९ चा एक GR आहे त्यात त्यांनी पोहरदेवीच्या विकासासाठी दिलेल्या 25 कोटींच्या निधीला स्थगिती देण्याचं काम ठाकरेंनी केले. आता माफी नेमकी कुणी मागावी, याचं उत्तर त्यांनी द्यावं असं राणे म्हणाले.

अब चाँद पे पाँव जमाना है…! चांद्रयान-3 लॉन्चिंगपूर्वी ऑनलाईनच्या दुनियेत काय होतयं ट्रेन्ड

ते पुढे म्हणाले, सगळ्यात मोठा खोटारडा म्हणजे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणारा संजय राऊतचा मालक आहे. फडणवीसांवर खोटे आरोप करू नका, असा इशाराही राणे यांनी दिला.

दरम्यान, सोळा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. याबाबत विचारले असता राणे म्हणाले, विधासभेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच त्यांना कायद्याचेही उत्तम ज्ञान आहे. संजय राऊतच्या मालकाचेही ते गुरू आहेत. त्यामुळे याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. या प्रकरणी ते योग्य निर्णय घेतील याचा आम्हाला विश्वास आहे, असे राणे म्हणाले.

Tags

follow us