Download App

‘त्याशिवाय’ निवडणुकीत रिझल्ट मिळणार नाही; जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना खास मंत्र

Jayant Patil : आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष बनवायचा हे नुसते बोलून चालणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकाने एक तास राष्ट्रवादी आणि बूथ कमिट्या बांधा. बूथ कमिट्यांकडे लक्ष दिले नाही तिथे तीस ते चाळीस हजार मतांनी आमचा पराभव झाला. कमिट्या केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हे ठरवून येथून जाऊ या, असा मंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पाटील म्हणाले, अजितदादा आणि झिरवळ साहेब तुम्ही योगा कार्यक्रमाला जायला हवं होत. तुमच्यापेक्षा जड आणि जाड लोक योगा करत होते. जाऊ द्या पण सत्तेत कोण किती वाकू शकत किंवा कोण किती झुकू झकत हे बघण्याचे काम विरोधी पक्षनेत्याचे आहे. तंटामुक्त अभियान आणि ग्रामस्वछता अभियान सुरू करत असताना तिजोरीत पैसे नव्हते पण आर. आर. पाटील यांनी ती योजना नावारुपाला आणली.

पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार सुरू आहे.अजित पवार यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडायला हवा. पाच वर्ष मी प्रदेशाध्यक्ष आहे पण बूथ कमिटी करा सांगतो जर बूथ कमिटी झाली नाही तर रिझल्ट येणार नाही. मी पाच वर्ष एक महिने प्रदेशाध्यक्ष आहे. अजित दादांनी माझे महिन्यासकट कालावधी मोजला, असे म्हणताच सभागृहात जोरदार हशा पिकला. शरद पवार यांच्यासारख गोड बोललं तर पक्ष वाढेल असे जाता जाता म्हणत जयंत पाटील यांनी पुन्हा अजित पवार याना डिवचले, अशी चर्चा उपस्थितांत सुरू होती.

महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यकर्त्यांच्या जिवावरचा पक्ष आहे. लाखो कार्यकर्त्यांमुळे पक्ष येथे आला आहे. नुसत भाषणात बोलून चालणार नाही. त्यासाठी काम करावे लागणार आहे. नेत्यांना विनंती आहे की बूथ कमिट्या बांधा. निवडणुक लढत नसलेल्या मतदारसंघांनाही सोडू नका, असा मंत्र पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिला.

Tags

follow us