Download App

चहात सोन्याचे पाणी टाकून पिता का ? ; सरकारच्या कोट्यावधींच्या चहापानावर अजित पवार संतापले

Ajit Pawar : वर्षा बंगल्यातील चहापाण्याचे 2 कोटी 38 लाखांचे बिल चांगलेच चर्चेत आहे. आता याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. वर्षा बंगल्याचे खानपानाचे बिल 2.38 कोटी रुपये आले.  मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो. आमचे सहकारी मुख्यमंत्री होते. परंतु, चार महिन्यात बिल इतके बिल कसे आले. चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते का काही कळायला मार्ग नाही. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करत सरकार चमकोगिरी करत आहे, असा आरोप पवार यांनी केला.

हे सुद्धा वाचा : Ajit Pawar यांचा भाजपवर गंभीर आरोप गुंडांना घेऊनच मंत्री फिरत होते!

उद्यापासून महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभुमीव महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला.यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

Ajit Pawar Hoarding : महाराष्ट्राचे  भावी मुख्यमंत्री अजितदादा, पोस्टरची सर्वत्र चर्चा

पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. मागील आठ महिन्यात या सरकारने नुसत्या जाहिरातींवर 50 कोटी रुपये खर्च केले. मुंबई महापालिकेकडून माहिती घेतली तर तेथून जाहिरातींसाठी 17 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मिळाली. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत तर दुसरीकडे सरकार अशी पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

पवार पुढे म्हणाले, की राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कुटुंब, प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला प्रकरण, ठाणे मनपा अधिकाऱ्याची गुंडगिरी, आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रकार असो यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था खालावल्याचे लक्षण आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे त्यांनी सांगितले.ते म्हणाले, की कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदा विक्रीतून फक्त दोन रुपये मिळाल्याची एक क्लीप मिळाली. त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काय स्थिती आहे हे शेतकऱ्यानेच सांगितले आहे. मी म्हणतो अशा प्रकारे शेतकऱ्यांवर दुर्दैवी प्रसंग यायला नको.

 

Tags

follow us